वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील वाराणासी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उमेदवारी अर्जासोबत प्रतिज्ञापत्रही सादर केलं. या प्रतिज्ञापत्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वैयक्तिक माहिती आणि संपत्ती समोर आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वार्षिक उत्पन्न गेल्या पाच वर्षात दुप्पट झालं आहे. पंतप्रधान मोदींचं 2013-14 चं वार्षिक उत्पन्न 9 लाख 69 हजार 711 रुपये एवढं होतं, आता म्हणजे 2017-18 चं मोदींचं वार्षिक उत्पन्न 19 लाख 92 हजार 520 रुपये आहे.
पत्नीची माहिती ‘माहित नाही’
मोदींनी प्रतिज्ञापत्रात पत्नी जशोदाबेन यांच्या नावाच उल्लेख केला आहे. मात्र, त्यांचा पॅन कार्ड नंबर आणि उत्पन्न या रकान्यात ‘माहित नाही’ असा उल्लेख केला आहे. किंबहुना, प्रतिज्ञापत्रात जिथे जिथे पत्नीच्या शिक्षण, व्यवसाय, संपत्ती इत्यादी गोष्टींबाबत माहिती विचारण्यात आली आहे, तिथे तिथे ‘माहित नाही’ असेच उल्लेख करण्यात आला आहे.
मोदींचं वर्षनिहाय उत्पन्न :
राजकीय पदांमुळे मिळणारा सरकारी पगार आणि बँकांमधील ठेवींवरील व्याज या दोन मार्गाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पैसा मिळतो.
जंगम मालमत्तेचं विवरण :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं शिक्षण