लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातलं राजकीय वातावरण तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या झडत आहेत. या दम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्वात मोठे न्यूज नेटवर्क TV9 ला एक्सक्लूझिव्ह इंटरव्यू दिला आहे. या मुलाखतीदरम्यान त्यांनी विविध मुद्द्यांवर मनमोकळेपणाने भूमिका मांडली आहे. विशेष म्हणजे याआधी तुम्ही नरेंद्र मोदींना कधी ज्या विषयावर चर्चा करताना पाहिलं नसेल अशा मुद्द्यांवर मोदींनी भाष्य केलं आहे. निवडणुकीच्या दरम्यान सर्वात ज्वलंत मुद्द्यावर चर्चा करताना मोदी म्हणाले, “मी अशा गोष्टींचा खुलासा करेन ज्याबद्दल मी अद्याप कोणाशीही बोललो नाही.” त्यामुळे ही मुलाखत किती खास आहे हे आपण समजू शकता.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची ही राउंड टेबल मुलाखत आहे. मुलाखतीदरम्यान पीएम मोदींनी टीव्ही 9 च्या पाच व्यवस्थापकीय संपादकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. ही मुलाखत आमच्या TV9 मराठी वाहिनी तसेच आमच्या YouTube चॅनलवर प्रसारित केली जाईल. ही मुलाखत आज रात्री ८ वाजता प्रसारित होणार आहे. खाली दिलेल्या लिंकवर तुम्ही पंतप्रधान मोदींची मुलाखत थेट पाहू आणि ऐकू शकता.
या मुलाखतीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांनाही उत्तर दिलं आहे. पीएम मोदींनी महाराष्ट्रासोबतच देशाची सध्याची राजकीय परिस्थिती आणि देशाची आर्थिक ताकद यावरही आपले मत मांडले आणि प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.
मुलाखतीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सरकारच्या भविष्यातील रणनीतीवरही चर्चा केली. देशात पुन्हा एकदा त्यांचे सरकार सत्तेवर आले तर त्यांच्याकडे लोकांसाठी काय रोडमॅप आहे, असे पंतप्रधान मोदींनी सांगितले आहे. याशिवाय त्यांनी विरोधातील इंडिया आघाडी आणि काँग्रेस पक्षाबाबतही आपले मत व्यक्त केले.
पंतप्रधानांनी राम मंदिराबाबत विरोधकांच्या आरोपांनाही उत्तर दिलंय. या मुलाखतीत उद्धव ठाकरेंबद्दल पंतप्रधान काय म्हणाले हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. TV9 चे दर्शक आज रात्री 8 वाजता पंतप्रधान आणि पाच संपादकांची ही संपूर्ण मुलाखत पाहू शकतील.