PM Modi in Maharashtra : …तर त्यांचं नाव आणि पत्ता लिहून मला पाठवा, अकोल्याच्या सभेत पीएम मोदींची मोठी घोषणा

| Updated on: Nov 09, 2024 | 1:17 PM

PM Modi in Maharashtra : "काँग्रेस आणि या आघाडीच्या लोकांनी महाराष्ट्राची अनेक दशकापासूनची मागणी पूर्ण केली नव्हती, ती आम्ही पूर्ण केली. आम्हाला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच सौभाग्य मिळालं. केंद्रात एनडीएच सरकार वेगाने चालतय. त्याच तेज गतीने महायुती सरकार पुन्हा महाराष्ट्रात पाहिजे. यासाठी मी तुमचा आशिर्वाद मागायला आलो आहे" असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

PM Modi in Maharashtra : ...तर त्यांचं नाव आणि पत्ता लिहून मला पाठवा, अकोल्याच्या सभेत पीएम मोदींची मोठी घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी
Follow us on

“आज 9 नोव्हेंबरची तारीख ऐतिहासिक आहे. आजच्याच दिवशी 2019 मध्ये देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिराबद्दल निर्णय दिला होता. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर प्रत्येक धर्माच्या लोकांनी संवेदनशीलतेचा परिचय दिला. राष्ट्र प्रथम ही भावना देशाची मोठी ताकद आहे. 2014 ते 2024 ही 10 वर्ष महाराष्ट्राने भाजपाला सतत मनापासून आशिर्वाद दिला. महाराष्ट्राचा भाजपावर विश्वास आहे, याचं कारण आहे, महाराष्ट्राची देशभक्ती. महाराष्ट्राच्या लोकांची राजकीय समज आणि दूरदृष्टी. यामुळे माझ्यासाठी महाराष्ट्राच्या सेवेच सुखच वेगळं आहे” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. अकोले येथे पंतप्रधान मोदींची प्रचारसभा झाली. “केंद्रात आमच्या सरकारला पाच महिनेच झाले आहेत. या पाच महिन्यात लाखो कोटी रुपयांचे प्रकल्प सुरु केले. यात महाराष्ट्राशी संबंधित इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट आहेत. महाराष्ट्रातील वाढवण बंदराचा खर्च 80 हजार कोटी रुपये आहे. महाराष्ट्रातलं हे बंदर भारतातील सर्वात मोठ बंदर असेल” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

“मागच्या दोन कार्यकाळात मोदीने गरीबांना चार कोटी पक्की घरी बांधून दिली. आता आम्ही गरीबांसाठी तीन कोटी नवीन घर बांधणीची सुरुवात केली. यामुळे महाराष्ट्रातील लाखो गरीबांच पक्क्या घराच स्वप्न पूर्ण होईल. माझ एक काम कराल. आता निवडणुकीच्यावेळी तुम्ही गावागावात, घराघरात जालं, लोकांना भेटालं. तुम्हाला कुठे जाताना एखाद कुटुंब झोपडीत राहताना दिसलं, तर नाव, पत्ता लिहून मला पाठवा. त्यांना सांगा मोदींनी मला पाठवलय, तुला पक्क घर मिळेल. माझ्यासाठी तुम्हीच मोदी आहात. तुम्ही त्यांना शब्द द्या, मी पूर्ण करीन” असं आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी प्रचारसभेत दिलं.

‘उपचाराची चिंता करु नका. त्यांचा हा मुलगा आहे’

“निवडणूक काळात मी 70 वर्षावरील वृद्धांना मोफत उपचारांच आश्वासन दिलं होत. आमच्या सरकारने ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेसाठी ही योजना लॉन्च केली आहे. 70 वर्षावरील वृद्धांना आयुषमान कार्ड मिळायला सुरुवात झाली आहे. सबका साथ, सबका विकास या भावनेसह या योजनेचा लाभ प्रत्येक वर्गाला मिळेल. तुमच्या कुटुंबात कोणी 70 वर्षावरील असेल, तर त्यांच्या उपचाराची चिंता करु नका. त्यांचा हा मुलगा आहे” असं पीएम मोदी म्हणाले.