“निवडणुकीचा काय निकाल लागणार हे तुम्ही लोकांनी आजच दाखवलय. ही गर्दी सांगतेय, महाराष्ट्रात महायुतीच भारी बहुमताने सरकार येणार. चिमूरच्या जनतेने आणि संपूर्ण महाराष्ट्राने ठरवलय भाजपा-महायुती आहे, तर गती आहे, महाराष्ट्राची प्रगती आहे” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ते विदर्भातील चिमूर येथे प्रचारसभेत बोलत होते. “मी अनेक वर्ष संघटनेत कार्यकर्ता म्हणून काम केलय. अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करणं सोप नाहीय. मी महाराष्ट्र भाजपाला शुभेच्छा देईन. त्यांनी खूप शानदार संकल्प पत्र जारी केलय. हे संकल्प पत्र लाडक्या बहिणींसाठी, शेतकऱ्यांसाठी, देशाच्या युवा शक्तीसाठी महाराष्ट्राच्या विकासासाठी एकापेक्षा एक शानदार संकल्प त्यात आहेत. महाराष्ट्राच्या भविष्याला उज्वल बनवण्यासाठी खूप योजना आणि संकल्प आहेत” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
“संकल्प पत्र पुढच्या पाच वर्षांसाठी महाराष्ट्राच्या विकासाची गँरेंटी बनेल. महायुतीसोबत केंद्रात एनडीएच सरकार म्हणजे महाराष्ट्रात डबल इंजिन सरकार. म्हणजे विकासाची दुप्पट गती. महाराष्ट्राच्या लोकांनी मागच्या अडीच वर्षात विकासाची ही डबल गती पाहिली आहे. आज महाराष्ट्र देशातील ते राज्य आहे. जिथे सर्वात जास्त परदेशी गुंतवणूक होत आहे” असं पीएम मोदी म्हणाले. “इथे नवीन एअरपोर्ट बनत आहे. नवीन महामार्ग बनत आहेत. आज महाराष्ट्रात एक डझन वंदे भारत ट्रेन धावत आहे. राज्यात 100 पेक्षा जास्त स्टेशन्सचा कायाकल्प केला जातोय. राज्यात अनेक रेल्वे मार्गांचा विस्तार होतोय. महायुती सरकार काय स्पीडने काम करते आणि आघाडीवाल्यांची जमात कशी काम रोखते हे चंद्रपूरच्या लोकांपेक्षा जास्त कोणाला माहितीय” असं पीएम नरेंद्र मोदी म्हणाले.
‘काँग्रेसवाल्यांनी डबल पीएचडी केलीय’
“इथले लोक दशकांपासून रेल्वेची मागणी करत होते. पण काँग्रेस आघाडीने हे काम केलं नाही. आमच्या सरकारने रेल्वे लाईनला मंजुरी दिली. नागपूरहून गडचिरोली रेल्वे लाईनच काम पूर्ण होणार आहे. यामुळे तुमचा वेळ वाचेल. तुमचे पैसे वाचतील. महाराष्ट्राच वेगवान विकास ही आघाडीच्या आवक्यातली गोष्ट नाही” असं पीएम मोदी म्हणाले. “आघाडीवाल्यांनी केवळ विकासात ब्रेक लावण्यावर PHD केलीय. काम अडकवणं, लटकवणं आणि भरकटवण यात काँग्रेसवाल्यांनी डबल पीएचडी केलीय. अडीचवर्षात मेट्रो ते वाढवण बंदर, समृद्धी महामार्गापर्यंत केवळ विकास प्रकल्प रोखण्याच काम केलं. म्हणून आघाडी म्हणजे भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे खेळाडू” अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.