‘काँग्रेसने हिंदू बजेट आणि मुस्लिम बजेट असा विचार केला’, मोदींचा घणाघात

| Updated on: May 15, 2024 | 6:42 PM

"काँग्रेस आणि त्यांच्या सहकारी पक्षांनी काय केलं तर विकासाच्या बजेटमध्ये दरार आणण्याचं काम केलं, त्यातही वाटाघाटी करण्याचा विचार केला. त्यांनी हिंदू बजेट आणि मुस्लिम बजेट असा विचार केला होता", असा मोठा दावा नरेंद्र मोदी यांनी केला.

काँग्रेसने हिंदू बजेट आणि मुस्लिम बजेट असा विचार केला, मोदींचा घणाघात
पंतप्रधान नरेंद्र मोदी
Follow us on

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज कल्याणमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेत नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. “काँग्रेस आणि त्यांच्या सहकारी पक्षांनी काय केलं तर विकासाच्या बजेटमध्ये दरार आणण्याचं काम केलं, त्यातही वाटाघाटी करण्याचा विचार केला. त्यांनी हिंदू बजेट आणि मुस्लिम बजेट असा विचार केला होता. त्यांनी 15 टक्के बजेट मुसलमानांसाठी करण्याचा विचार केला होता. त्यांनी धर्माच्या नावाने देश बनवायचा होता. बनवून टाकला होता. आता हिंदू बजेट आणि मुसलमान बजेट? याने देशाचं भलं होईल का? हे पाप काँग्रेस करत होती. मला आठवतं, मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो. मी सर्वात आधी विरोध केला होता. काँग्रेस आणि इंडिया आघाडी सत्तेत आले तर हेच करणार आहेत. आपण एक आहोत की नाही? अशा लोकांना फक्त इथेच नाही तर पूर्ण महाराष्ट्रात एक तरी जागा जिंकू दिलं पाहिजे का? एकाही पोलिंग बुथवर त्यांचा नंबर लागला पाहिजे का?”, असे सवाल मोदींनी केले.

“जे लोक, ज्यांनी पिढ्यांपिढ्या गरिबा हटावोचा खोटा नारा दिला आणि प्रत्येक निवडणुकीला अफूच्या गोळीची माळा घेऊन येतात. नेहरुंपासून ते 2014 च्या निवडणुकीपर्यंत तुम्ही पाहिलं आहे की, ते गरिबीची माळा जपत असतात. ते लोक ज्यांनी भ्रष्टाचाराला शिष्टाचार बनवून ठेवलं होतं, शिवाजींच्या भूमीवर मी आपल्याला विचारु इच्छितो की, असे लोक देशाला पुढे घेऊन जाऊ शकतात का? तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करु शकतात का?”, असे प्रश्न नरेंद्र मोदी यांनी उपस्थित केले.

‘मोदीने येऊन ब्रेकला हटवलं’

“मला आनंद आहे, गेल्या सरकारमध्ये म्हणजे रिमोटवाल्या सरकारमध्ये जो ब्रेक लागला होता, मोदीने येऊन ब्रेकला हटवलं आणि गाडीला टॉप गिअरला आणलं आहे. भिवंडी-कल्याण समृद्धी महामार्गाशी जोडला गेलाय, दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे लवकरच पूर्ण होणार आहे, वडोदरा-मुंबई द्रुतगती मार्गदेखील भिवंडीला मिळेल. वन डे भारत ट्रेन सुरु झाल्या आहेत. मेट्रोचं काम इथे सुरु होणार आहे. कपड्याच्या उद्योगांना गती मिळेल. रोजगाराच्या संधी वाढतील. त्यामुळे इथे प्रत्येक ठिकाणी विश्वास आणि उमंग आहे”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

‘रातोरात हुकूम काढला की, सर्व मुसलमान ओबीसी’

“आजही काँग्रेस आणि इंडिया आघाडी तृष्टीकरणाचा खेळ खेळत आहेत. त्यांचं लक्ष एसटी, एससी आणि ओबीसीच्या आरक्षणावर आहे. त्यांनी प्रयोग सुरु केला आहे. कर्नाटकात त्यांनी त्याची लॅबोरेटरी बनवली आहे. कर्नाटकात जितके मुसलमान होते, त्यांनी रातोरात हुकूम काढला की, सर्व मुसलमान ओबीसी आहेत. ओबीसींच्या कोट्यातील खूप मोठी लूट केली. आरक्षणाची हीच लूट काँग्रेस संपूर्ण देशात करु इच्छित आहे”, असा दावा नरेंद्र मोदींनी केला.