मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) आज दोन दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज दुपारी ते देहूत होते. नंतर ते दुपारी मुंबईत आले. देहूत संत तुकाराम यांच्या शिळा मंदिराचं पंतप्रधा नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एका पुस्तिकेचं प्रकाशन करण्यात आलं. नंतर मोदींनी वारकऱ्यांना संबोधित केलं. त्यानंतर ते मुंबईत आले. त्यांनी मुंबईत क्रांतिकारी गॅलरीचं उद्घाटन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी देहूत येण्यासाठी लोहगाव विमानतळावर उतरले. यावेळी त्यांचं अजित पवार (ajit pawar) यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. तर मुंबईत आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी विमानतळावर जाऊन मोदींचं स्वागत केलं. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केलेल्या स्वागताचे दोन फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोतून मोदी दोन्ही नेत्यांच्या खांद्यावर हात ठेवून बोलताना दिसत आहेत. त्यातून मोदींची आत्मियता दिसत आहे.
अजित पवार यांनी दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं लोहगाव विमानतळावर स्वागत केलं. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही उपस्थित होते. यावेळी अजितदादांनी मोदींना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं. अजितदादा मोदींचं स्वागत करत असल्याचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोत अजित पवार हातजोडून मोदींना अभिवादन करताना दिसत आहेत. तर मोदी अजितदादांच्या खांद्यावर हात ठेवून बोलताना दिसत आहेत. मोदी विमानातून उतरताना हातजोडूनच आले. त्यानंतर ते अजितदादांच्या जवळ गेले. त्यांनी अजितदादांच्या खांद्यावर हात ठेवला. या फोटोत मोदी त्यांच्याशी काही तरी बोलताना दिसत आहे. त्याचीच आज दिवसभर चर्चा सुरू होती.
देहूतील कार्यक्रम आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी विमानतळावर जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत केलं. या फोटोतही अजित पवार यांच्या प्रमाणेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हात जोडलेले दिसत आहेत. तर मोदी त्यांच्या खांद्यावर हात ठेवून काही तरी बोलताना दिसत आहे. उद्धव ठाकरे यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांच्याकडे रोखून पाहत मोदी काही तरी आत्मियतेने विचारताना दिसत आहेत. तर अजित पवार आणि आदित्य ठाकरे हे या दोन्ही नेत्यांकडे पाहताना दिसत आहेत. त्यानंतर मोदी यांनी आदित्य ठाकरे यांच्याही खांद्यावर हात ठेवून त्यांच्याशीही चर्चा केली. त्यांचीही विचारपूस केली.
मोदी यांचे ठाकरे कुटुंबीयांशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. उद्धव ठाकरे हे मोदींना मोठा भाऊ मानतात. ते भाषणात अनेकदा तसा उल्लेखही करतात. आज बऱ्याच महिन्यानंतर मोदी आणि ठाकरे प्रत्यक्ष एकत्र भेटले. त्यामुळे मोदींनी उद्धव ठाकरेंची आस्थेवाईक चौकशी केली. त्यामुळे हा फोटो अधिक चर्चेत आला आहे.