महाराष्ट्र – राज्यातील (Maharashtra) महत्त्वाच्या नेत्यांचे सहकारी साखर कारखाने (Cooperative Sugar Factories) त्यांच्या विधानसभा क्षेत्रात आहेत. काही राजकीय नेत्यांचे साखर कारखाने राज्यात अनेक ठिकाणी आहेत. त्यात यंदा उसाचा गाळप अधिक झाला आहे.पश्चिम महाराष्ट्रात यंदाच्यावर्षी सहकारी साखर कारखाने अधिक महिने चालवले आहेत. काही कारखाने तर एप्रिल महिन्यापर्यंत सुरु होते. सध्या अनेक राजकीय नेत्यांचे (Politics leader) साखर कारखाने अडचणीत आहेत. यामध्ये धनंजय मुंडे, पंकजा मुंडे , बबनराव पाचपुते, कल्याणराव काळे यांच्या कारखान्यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. साखर आयुक्तांचा राज्यभरातील सात साखर कारखान्यांना दणका दिला असल्याची माहिती मिळाली आहे. 70 टक्क्यांपेक्षा कमी एफआरपी देणारे हे कारखाने असून त्यांनी एकूण 14503.59 लाख आरआरसी रक्कम थकवली असल्याचे आयुक्तांनी जाहीर केले आहे.