Maharashtra Election 2024 : ‘आशिष कुरेशी जी, सॉरी…’ सज्जाद नोमानीच्या Video वरुन राजकारण तापलं

| Updated on: Nov 16, 2024 | 10:50 AM

Maharashtra Election 2024 : ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे प्रवक्ता मौलाना खलील उर्ररहमान सज्जाद नोमानी यांचा एक व्हिडिओ समोर आल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा प्रचार अखेरच्या टप्प्यात पोहोचला आहे.

Maharashtra Election 2024 : आशिष कुरेशी जी, सॉरी...  सज्जाद नोमानीच्या Video वरुन राजकारण तापलं
आशिष शेलार
Image Credit source: Facebook
Follow us on

ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाच्या सज्जाद नोमानी यांच्या एका व्हिडिओवरुन राजकारण तापलं आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा प्रचार अखेरच्या टप्प्यात आहे. व्होट जिहादच्या मुद्यावरुन काँग्रेस आणि भाजप नेते X वर भिडले आहेत. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी X वर एक पोस्ट केली. त्यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे, राहुल गांधी आणि नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला.

एक ऐसा व्होट जिहाद करो…

जिसके सिपेसालार है : शरद पवार

अझीम सिफाही है : उद्धव ठाकरे, राहुल गांधी, नानाजी पटौले

और हमारा निशाना महाराष्ट्र नही…तो दिल्ली…

ही मुक्ताफळे आहेत, ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाचे सज्जाद नोमानी यांची…

असं म्हणतानाच, एक है तो सेफ है…एक है तो नेक है…या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाक्यांची त्यांनी आठवण करुन दिली.

आशिष शेलार यांच्या पोस्टला काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी उत्तर दिलं. “आशिष कुरेशी जी , सॉरी आशिष शेलार जी आपल्याला पसमांदा मुस्लिम समाज उत्थान समितीने पाठिंबा दिला आहे असे समजले. याला काय म्हणावे? बरं!” असं उपरोधिक टि्वट सचिन सावंत यांनी केला. भाजपाच दुटप्पीपणा त्यांनी दाखवून देण्याचा प्रयत्न केला.


म्हणूनच भाजपकडून बेटेंगे तो कटेंगेच्या प्रचारावर भर

भाजपने निवडणूक प्रचारात व्होट जिहादचा मुद्दा लावून धरला आहे. भाजपा नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या भाषणातून सातत्याने हा मुद्दा उचलत आहेत. लोकसभेला मतदानाची जी पद्धत होती, त्यामुळे भाजपाला अनेक जागांवर नुकसान झालं. त्यामुळेच भाजपकडून बेटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है…एक है तो नेक है…या मुद्यांवर प्रचारात भर दिला जातोय.


‘आता मतांचं धर्मयुद्ध हे आपल्याला लढावं लागेल’

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुण्यात खडकवासला येथे सभा झाली. तिथे त्यांनी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे प्रवक्ता मौलाना खलील उर्ररहमान सज्जाद नोमानी यांची क्लिप ऐकवली. “आता व्होट जिहादचा नारा दिला आहे आणि व्होट जिहादचा सेनापती कोण आहे? तुम्ही ऐकलं आहे. या व्होट जिहादकरात हे त्या उलेमानचे तळवे चाटत आहेत आणि या ठिकाणी सांगत आहेत की, दंगेखोरांना आम्ही सोडून देऊ. या ठिकाणी व्होट जिहाद होणार असेल तर माझं तुम्हाला आवाहन आहे, आता मतांचं धर्मयुद्ध हे आपल्याला लढावं लागेल. आपण आता एक राहिलो तरच सेफ राहू. एक असू तर सुरक्षित आहोत” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.