मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची अहमदाबादेत भेट झाल्याचा दावा सध्या केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून या भेटीबाबत स्पष्ट नकार देण्यात आलाय. तर स्वत: अमित शाह यांनी मात्र सर्व भेटी सार्वजनिक केल्या जात नाहीत असं सांगत याबाबतचं गूढ वाढवलं आहे. शाह आणि पवारांच्या भेटीवेळी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेलही उपस्थित होते असं सांगितलं जात आहे. दरम्यान, या भेटीच्या चर्चेवर आता प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.(Praful Patel clarification on Amit Shah and Sharad Pawar meet)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पार्टी एकत्र येणार या चर्चा चुकीच्या आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार स्थिर आणि सुरक्षित आहेत. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारचा पाया शरद पवार यांनीच रचला आहे. त्यामुळे अशा चर्चांमध्ये काही तथ्य नसल्याचं पटेल यांनी म्हटलंय.
प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्टीकरण देण्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीत पत्रकार परिषदेत पवारांच्या भेटीबाबत एक वक्तव्य केलं होतं. सर्व भेटी सार्वजनिक केल्या जात नाहीत, असं शाह यांनी म्हटलं. शाहांच्या या वक्तव्यानंतर राज्यात जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांकडून पवार आणि शाह यांची भेट झालीच नसल्याचं म्हटलंय.
26 मार्चला अहमदाबादमधील एका फार्म हाऊसवर ही भेट झाल्याची माहिती एका गुजराती दैनिकाने दिली आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसकडून या वृत्ताचे खंडन करण्यात आले आहे. शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल हे अहमदाबादमधून थेट मुंबईला आले. ते कोणालाही भेटले नाहीत. मात्र, आता एका गुजराती दैनिकात त्यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याची बातमी आली आहे. हे भाजपचे षडयंत्र आहे. शरद पवार यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याची बातमी निव्वळ अफवा आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना स्पष्ट केलं आहे.
शरद पवार आणि प्रफुल पटेल यांची अमित शाह यांच्यासोबत गुप्त चर्चा झाल्याची माहिती ‘दिव्य भास्कर’ या गुजराती वृत्तपत्राने दिली आहे. पटेल आणि पवार प्रायव्हेट जेटने आले होते. त्यानंतर शांतिग्राममधील गेस्टहाऊसला तिघांची भेट झाली, असा दावा या बातमीत करण्यात आला आहे. या भेटीचे परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर या भेटीचे परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Pandharpur By-Election : शरद पवारांकडून आधी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी संधी, आता वडिलांच्या जागी तिकीट, कोण आहेत भगीरथ भालके? https://t.co/f2PjZBTqN5 #PandharpurBypoll | #BharatBhalke | #BhagirathBhalke | #SharadPawar | #NCP | @NCPspeaks
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 29, 2021
संबंधित बातम्या :
शरद पवार अहमदाबादमध्ये अमित शाहांना भेटले का, राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
शरद पवार-अमित शाहांची भेट; नव्या पिढीला हे राजकारण समजणार नाही: जितेंद्र आव्हाड
Praful Patel clarification on Amit Shah and Sharad Pawar meet