मुंबई : “महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी स्वत:हून चुका कबूल केल्या आहेत. आमच्याकडून काही चुका घडलेल्या आहेत. त्यामुळे दुरुस्ती करावी. 50 टक्के वीजबिल माफ कराण्याचा प्रस्ताव पाठवला आहे, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार परस्पर सवलत नाकारतात. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आम्ही प्रश्न विचारतो, महाराष्ट्राचा खरा मुख्यमंत्री कोण? याचा खुलासा करा”, असा घणाघात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडक यांनी केला. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते (Prakash Ambedkar ask question to Uddhav Thackeray).
“अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यापैकी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत? त्याचा खुलासा केला तर अधिक चांगलं होईल. अन्यथा वीजबिल भरु नका. वीजबिल विरोधात आम्ही आंदोलन सुरु केलं आहे, ते आंदोलन येत्या काळात आणखी तीव्र करु, असा इशारा आम्ही सरकारला देत आहोत”, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं (Prakash Ambedkar ask question to Uddhav Thackeray).
“घरगुती वापराच्या ग्राहकांना सवलत देण्याबाबतची फाईल उद्धव ठाकरे यांच्याकडे का नेली नाही, याबाबत ऊर्जा खात्याने खुलासा करावा. ही फाईल अजित पवारांकडे जाते. अजित पवार परस्पर मुख्यमंत्र्यांना न विचारता सवलत नाकारतात. खरंतर ते अर्थमंत्री आहेत. त्यांचा अधिकार बजेटबाबत आहे. बजेटच्या बाहेर काही असेल तर ते मुख्यमंत्र्यांकडे आणि कॅबिनेटकडे नेणं आवश्यक आहे”, अशी रोखठोक भूमिका प्रकाश आंबेडक यांनी मांडली.
“वीजबिलचं कलेक्शन अत्यंत तोटकं पडलं आहे. त्यामुळे मार्च 2020 मध्ये थकबाकी 51 हजार 946 कोटींवर पोहचली आहे. पण हीच थकबाकी 2014 मध्ये निम्म्यापेक्षा कमी होती. घरगुती वापरावर सूट मागितली जात आहे. या कालावधीत 3500 कोटींचा बोजा पडला आहे. मार्च महिन्यानंतर वीजबिलात वाढ करण्यात आली. ही वाढ कशाबद्दल करण्यात आली याचा खुलासा कुठेही दिसत नाही. त्यामुळे बिलात फुगवटा झाला”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
“महावितरणाचे अधिकारी चुका कबुल करत आहेत. लॉकडाऊनच्या कालावधीत मीटर रिडिंगचं कंत्राट देण्यात आलं होतं. त्या कंत्राटाला स्थगिती देण्यात आली नव्हती. पण त्यांना मीटर रिडींग घेण्यापासून बंदी करण्यात आली. त्यामुळे मीटरचं रिडींग कन्सोलिटेडरित्या ठरवण्यात आलं. कन्सोलिटेड युनीट ठरला की तुमचा स्लॅब बदलला”, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.
संबंधित बातमी :
कल्याणमध्ये भाजपच्या वीज बिलाची होळी, पोलीस आणि आमदारांमध्ये जोरदार झटापट
वाढीव वीज बिलांविरोधात आमदार कालिदास कोळंबकर आक्रमक, नायगावात वीज बिलांची होळी