मुंबई : लता मंगेशकर यांच्या निधनावर प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar on Lata Mangeshkar) यांनी महत्त्वाची टिप्पणी केली. लता मंगेशकर यांनी आंबेडकरांची गाणी गायली नाही, याबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा ते बोलत होते. लता मंगेशकरांनी आंबेडकरांची गाणी गायली नाही, हे त्या जिवंत असताना विचारायला हवं होतं, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. इतकंच काय तर जशी त्यांनी आंबेडकरांची गाणी गायली नाहीत, तशीच त्यांनी सरदार पटेल आणि नेहरुंचीही (Sardar Patel & Nehru) गाणी गायली नाही, असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. एकेकाची प्रिन्सिमल् असतात, असं म्हणत त्यांनी लता मंगेशकरांनी आंबेडकरी गाणी का गायली नाहीत, या प्रश्नाला उत्तर दिलंय. रविवारी (6 फेब्रुवारी, 2022) लता मंगेशकर यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर दिग्गजांनी लता मंगेशकर यांच्या गाण्याचं (Lata Mangeshkar Songs), त्यांच्या संगीत क्षेत्रातील योगदाराचं भरभरुन कौतुक करत त्यांना आदरांजली वाहिली होती. दरम्यान, आता याबाबतच प्रकाश आंबेडकर यांनी प्रत्युत्तर दिलंय.
दरम्यान, शाहरुख खानच्या फुंकरवरुनही त्याला ट्रोल करणाऱ्यांना प्रकाश आंबेडकर यांनी प्रत्युत्तर दिलंय. त्यांनी म्हटलंय की, मी मुस्लिम व्यक्तींच्या प्रेतयात्रेला मी गेलोय. मी बघितलंय की अनेक ठिकाणी फुंकर घातली जाते.हे देशाचं वैविध्यपूर्ण कल्चर आहे. ते स्वीकारायलाच हवं! ज्यांना पटत नसेल त्यांनी शांत रहावं, असा सल्लाही प्रकाश आंबेडकर यांनी दिलाय.
पार्श्वगायिका लता मंगेशकर यांच्या निधनाची दु:खद बातमी समजली. त्यांनी चित्रपट संगीत,भाव संगीत व अभंग गीत गायनातून भारतीय संगीत क्षेत्रात भरिव योगदान दिले. त्यांना भावपुर्ण आदरांजली.#LataMangeshkar
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) February 6, 2022
दरम्यान, शिवाजी पार्कवर केल्या जात असलेल्या अंत्यसंस्कारावरुनही प्रकाश आंबेडकर यांनी निशाणा साधलाय. मैदानावर खेळ खेळले जावे जावेत, स्मारकाकरता इतर अनेक जागा आहेत, खेळाच्या जागी अतिक्रमण करु नये, असं त्यांनी म्हटलंय. सोबतच शिवाजी पार्क हे शिवाजी पार्कच रहावं, त्याची स्मशानभूमी करु नये, असाही टोला प्रकाश आंबेडकर यांनी लगावला आहे. तसंच सोशल मीडियावर लोकांनी ट्रोल करण्याचं घाणेरडं काम करणाऱ्यांचाही प्रकाश आंबेडकर यांनी निषेध नोंदवलाय.
काल समाजमाध्यमांवर लता मंगेशकर यांच्या निधनानंतर काही लोकांनी ट्रोल करण्याचं घाणेरडे काम केलंय. त्यांचा आंबेडकर कुटुंबियांकडून जाहीर निषेध करतो.
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) February 7, 2022