‘त्या’ रिकाम्या खुर्चीवर ते राऊतांच्या चपलाही ठेवतील; मनसे नेत्याकडून शिवसेनेचा समाचार

| Updated on: Sep 25, 2022 | 12:57 PM

शरद पवार साहेबांवर टीका करताना माझी खूप पंचायईत होते. त्यांच्या हजार ख्वाईश आहेत. पण त्यांची पंतप्रधानपदाची महत्त्वकांक्षा पूर्ण होत नाही. ते नेहमीच दिसतंय, असं सांगतानाच शरद पवार यांनीच राज्यातील राजकारण गढूळ करण्याचं काम केलंय.

त्या रिकाम्या खुर्चीवर ते राऊतांच्या चपलाही ठेवतील; मनसे नेत्याकडून शिवसेनेचा समाचार
मनसे नेत्याकडून शिवसेनेचा समाचार
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

दत्ता कानवटे, औरंगाबाद: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांनी आयुष्यात एकदाच राज्यात 71 जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी त्यांच्यासोबत आर आर पाटील होते. त्यानंतर त्यांना अजून एवढ्या जागा जिंकता आल्या नाहीत. राज्यात स्वबळावर सत्ताही आणता आली नाही आणि ते आम्हाला सांगत आहेत. त्यांनी आमच्यावर टीका करू नये. त्यांचा पक्षही साडेतीन जिल्ह्या पुरताच मर्यादित आहे, असं म्हटलं तर चालेल का?, असा खोचक सवाल मनसेचे नेते प्रकाश महाजन (prakash mahajan) यांनी केला. तसेच येणाऱ्या काळात शिवसेना (shivsena) त्या रिकाम्या खुर्चीवर राऊतांच्या चपलाही ठेवेल, असा खोचक टोलाही प्रकाश महाजन यांनी लगावला.

प्रकाश महाजन मीडियाशी संवाद साधत होते. शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यावरून त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. बाळासाहेबांची खुर्ची रिकामी ठेवण्याऐवजी त्यांनी संजय राऊतांची खुर्ची ठेवली. येणाऱ्या काळात ते त्याच रिकाम्या खुर्चीवर संजय राऊतांच्या चपलाही ठेवतील. राऊत वाकले तर उद्धव ठाकरेंना अनेकांसमोर वाकावे लागेल, त्यामुळेच राऊतांची खुर्ची रिकामी ठेवली, अशी टीका प्रकाश महाजन यांनी केली.

शिवसेनेच्या गटप्रमुखांच्या मेळाव्यात शिवसेना नेते संजय राऊत यांची खुर्ची रिकामी ठेवण्यात आली होती. त्यावरही त्यांनी टीका केली. संजय राऊत यांची खुर्ची रिकामी ठेवली. हे मी नवीनच पाहिले. संजय राऊतांच्या खुर्ची ऐवजी बाळासाहेबांची खुर्ची ठेवली असती तर त्यांचे बाळासाहेबांवर प्रेम आहे हे लोकांना वाटलं असतं, असा चिमटा त्यांनी काढला.

हे सुद्धा वाचा

आम्हाला मैदानाबाबत असं काही करायचं नाही. कारण शिवाजी पार्क आणि बाळासाहेब ठाकरे यांचं फार जुनं नातं आहे. त्यामुळे अशा कोत्या मनाचं राजकारण करायचं नाही. त्यांच्या मेळाव्याला विरोध करण्याइतके राज ठाकरे कोत्या मनाचे नाहीत. त्यांचे राजकारण उमदेपणाचे आहे, असं सांगतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजकारण करत असतील तर मला त्याची माहिती नाही, असं ते म्हणाले.

शरद पवार साहेबांवर टीका करताना माझी खूप पंचायईत होते. त्यांच्या हजार ख्वाईश आहेत. पण त्यांची पंतप्रधानपदाची महत्त्वकांक्षा पूर्ण होत नाही. ते नेहमीच दिसतंय, असं सांगतानाच शरद पवार यांनीच राज्यातील राजकारण गढूळ करण्याचं काम केलंय, असा आरोप त्यांनी केला.

मुस्लिम आमच्या दयेमुळे भारतात राहिले आहेत. त्यांना देशविरोधी घोषणा देण्याचा आधिकार नाही. ते जर आशा घोषणा देत असतील तर आम्ही विचार आणि कृतीतून त्यांचा विरोध करायला तयार आहोत, असंही त्यांनी सांगितलं.