Prashant Koratkar : तेलंगणात काँग्रेस नेत्याच्या घरात प्रशांत कोरटकरला अटक, भाजप आमदाराचा गंभीर आरोप

| Updated on: Mar 25, 2025 | 10:51 AM

Prashant Koratkar : मागच्या अनेक दिवसांपासून अटक टाळण्याासाठी पळत असलेल्या प्रशांत कोरटकरला अखेर काल अटक झाली. तेलंगणमध्ये त्याला पकडण्यात आलं. आता प्रशांत कोरटकरवरुन आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. भाजप आमदाराने प्रशांत कोरटकरच्या अटकेवरुन गंभीर आरोप केले आहेत.

Prashant Koratkar : तेलंगणात काँग्रेस नेत्याच्या घरात प्रशांत कोरटकरला अटक, भाजप आमदाराचा गंभीर आरोप
Prashant Koratkar
Image Credit source: Tv9 Marathi
Follow us on

प्रशांत कोरटकरच्या अटकेवरुन भाजप आमदार परिणय फुके यांनी गंभीर आरोप केला आहे. “प्रशांत कोरटकरला लपवण्यात काँग्रेसचा हात आहे. तेलंगणात काँग्रेस नेत्याच्या घरात कोरटकरला अटक झाली” असा दावा परिणय फुके यांनी केला. महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांच्या भूमिकेवर उपस्थित केला प्रश्न. “तेलंगणमध्ये काँग्रेसच्याच एका नेत्याकडे कोरटकर लपून होता. कोरटकरला वाचवण्याचं काम काँग्रेसनेच केलं. कोल्हापूरमध्ये साहजिकपणे राग प्रकट होणारच” असं परिणय फुके म्हणाले. “कुणाल कामरा चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतोय. काँग्रेसचा त्याला पाठिंबा आहे. कुणाल कामरा आणि संजय राऊतांचा डिएनए एकच असेल. हरामखोरांचा डिएनए एकच असतो. 2014 ला शिवसेना कौरवांच्या भूमिकेत होती हे खरं आहे” असं परिणय फुके म्हणाले.

“प्रशांत कोरटकरला देशद्रोही घोषित केला पाहिजे. त्याला देशात राहण्याचा अधिकार नाही. पोलिस त्याचा रिमांड किती दिवस घेतात हे पाहू” असं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले. “औरंगजेबाची ओळख सत्ताधाऱ्यांनी पुन्हा करून दिली. तसा कामरा काढला गेलाय” असं वडेट्टीवार म्हणाले. “फडणवीस-शिंदे यांनी औरंगजेबाची कबर खोदण्यापेक्षा एकमेकांच्या कबरी खोदल्या पाहीजे. बरंच काही बाहेर पडेल” असं विजय वेडट्टीवार म्हणाले.

‘सोलापूरकरवर कारवाई होणार आहे का?’

“प्रशांत कोरटकरला अटक करायला इतका उशीर का लागला?. मग आत्ता सोलापूरकरवर कारवाई होणार आहे का?” असं सवाल रोहित पवार यांनी विचारला. “कोरटकर आणि सोलापूरकर हे या सरकारचे जावई आहेत. जयकुमार गोरे यांच्यासंदर्भात अनेक भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. यासंदर्भात आम्ही पुढच्या अधिवेशनात आक्रमक भूमिका घेऊ” असं रोहित पवार म्हणाले.

‘अजित पवारांवर बोलताना कामराने विचार करावा’

“आता प्रशांत कोरटकरला अटक केली आहे. सोलापूरकरवर कारवाई कधी होणार हा प्रश्न आहे. तो कायद्याच्या कचाट्यातून वाचला असेल, तरी या सोलापूरकरला जनता सोडणार नाही. आम्ही संविधानावर चर्चा करत असताना सोलापूरकर आणि कोरटकरचा विषय सभागृहात मांडू. अजित पवार यांच्यावर बोलताना कामरा यांनी विचार करावा. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाला कामराला योग्य उत्तर देईल” असं अमोल मिटकरी म्हणाले.