मुंबई : देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला जबर धक्का बसला. भाजपचे उमेदवार सुभाष साबने यांचा तब्बल 41 हजार मतांच्या फरकाने पराभव झाला. तर दुसरीकडे काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर हे विजयी ठरले. मोठ्या फरकाने पराभव झाल्यामुळे भाजपची रणनीती नेमकी कुठे चुकली ? जनतेची भाजपविषयीची आपली मते बदलली आहेत का ? असे प्रश्न विचारले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी भाजपचा पोटनिवडणुकीत पराभव का झाला असावा, याची नेमकी कारणं सांगतली आहेत. मुस्लीम समाजाने भाजपच्या द्वेषापोटी मतं केली असं दरेकर यांनी म्हटलंय.
“पंढरपुरात ताकदीने लढलो त्याचप्रमाणे देगलूरला ही लढलो. निवडणुकीत जय-पराजय होत असतो. त्याला अनेक कारणं असतात. गेल्यावेळी शिवसेना-भाजपला मतं पडली होती त्याच्यापेक्षा जास्त मतं यावेळी भाजपच्या उमेदवाराला पडली आहेत. निवडणुकीत मुस्लीम समाजाने भाजपच्या द्वेषापोटी मतदान केलं. तसेच वंचित बुहजन आघाडी 25 हजाराचे मत देईल, असा मला वाटलं होतं. पण पराभव हा पराभव असतो. तो आम्ही खुल्या मनाने स्वीकारला आहे,” असे प्रविण दरेकर म्हणाले. तसेच महाविकास आघाडीचा फॉर्म्यूला जमला म्हणतात. मग तो फॉर्म्यूला पंढरपुरात का जमला नाही, असा सवालदेखील त्यांनी केला.
दरम्यान देगलूरमध्ये विधानसभा पोटनिवडणुकीचा नुकताच निकाल लागला. या निकालात काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर 41933 मतांच्या फरकाने विजय मिळवला. अंतापूरकर यांना एकूण 108840 मते मिळाली. तर भाजपचे उमेदवार सुभाष साबने यांना 66907 मते मिळाली. पराभव झाल्यानंतर साबने यांनी आम्हाला निकाल मान्य आहे. जनतेने दिलेला कौल आम्ही विनम्रपणे स्वीकारतो. तसेच काय चुका झाल्या यावर विचार करुन पुढच्या निवडणुकीसाठी जोमाने कामाला लागू असे साबने म्हणाले होते
इतर बातम्या :
Weather Forecast : कोकण, मराठवाडा ते दक्षिण महाराष्ट्रात जोरदार पाऊस, हवामान विभागाकडून अलर्ट जारी
एसटीच्या सरकारमधील विलिनीकरणाची मागणी मुख्यमंत्री, आघाडीच्या वरिष्ठांकडे मांडणार; दरेकरांच्या भेटीनंतर परबांचं आश्वासन
Jobs: ऐन दिवाळीत गोड बातमी, सिपेट प्रकल्प नाशिकमध्ये होणार; हजारो बेरोजगारांना नोकऱ्या मिळणार!
अनिल देशमुखांविरोधात कोणतेही पुरावे नाहीत!, परमबीर सिंहांच्या प्रतिज्ञापत्रानं मोठी खळबळ https://t.co/CBeCrS6OIZ @AnilDeshmukhNCP @NCPspeaks @MumbaiPolice @Dwalsepatil @BJP4Maharashtra #AnilDeshmukh #parambirsingh #MumbaiPolice #Affidavit #NCP #BJP #InquiryCommission
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 3, 2021