Pravin Darekar On MVA Sarkar | अपक्ष आमदारांवर मुख्यमंत्र्यांचा दबाव असणार – Pravin Darekar
संभाजी राजे छत्रपती यांना अपक्ष उमेदवारांचा पाठिंबा होता. पण त्यांच्यावर मुख्यमंत्री किंवा शरद पवार यांचा दबाव असणार. शिवसेनेला नक्की उमेदवारी द्यायची होती की छत्रपतींचा अपमान करायचा होता याचं उत्तर महाराष्ट्राच्या जनतेला द्यावं लागणार.- प्रविण दरेकर
राज्यसभेचे माजी खासदार संभाजी राजे छत्रपती राज्यसभेची निवडणूक लढवणार नाहीत, हे आता स्पष्ट जालंय. मुंबईत त्यांनी याबाबतची मोठी घोषणा केली. सोबत त्यांंनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलंय. संभाजी राजे छत्रपती (SambhajiRaje Chatrapati) यांनी राज्यसभा निवडणुकीच्या (Rajya Sabha Election) पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी मोठी घोषणा केली आहे.याबाबतच बोलताना विधान परिषदेचा विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी संभाजी राजे यांनी नामी संधी गमावली असं वक्तव्य केलेलं आहे. संभाजी राजे छत्रपती यांना अपक्ष उमेदवारांचा पाठिंबा होता. पण त्यांच्यावर मुख्यमंत्री किंवा शरद पवार यांचा दबाव असणार. शिवसेनेला नक्की उमेदवारी द्यायची होती की छत्रपतींचा अपमान करायचा होता याचं उत्तर महाराष्ट्राच्या जनतेला द्यावं लागणार. उमेदवारी संदर्भात मुख्यमंत्र्यांचाच दबाव असणार असं यावेळी प्रविण दरेकर म्हटले आहेत.