बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार बळकट करा; दरेकरांचा मुख्यमंत्री ठाकरेंना टोला

| Updated on: Nov 17, 2020 | 6:00 PM

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. (pravin darekar slams cm uddhav thackeray over hindutva)

बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार बळकट करा; दरेकरांचा मुख्यमंत्री ठाकरेंना टोला
Follow us on

मुंबई: शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला हिंदुत्वाचा विचार पुढे नेण्याचं आणि बळकट करण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी करावं, असा टोला प्रविण दरेकर यांनी लगावला आहे. (pravin darekar slams cm uddhav thackeray over hindutva)

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने प्रविण दरेकर यांनी आज शिवाजी पार्क येथील शिवसेनाप्रमृखांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन त्यांच्या स्मृतींना वंदन केले. माझ्या राजकीय आणि सामाजिक जीवनाची सुरुवात शिवसेना, भारतीय विद्यार्थी सेनेपासून झाली. त्यामुळे बाळासाहेबांच्या विचारांचा आणि संस्कारांचा पगडा आजही माझ्यावर आहे. राज्याचा विरोधी पक्ष नेता म्हणून काम करत असताना निश्चितच त्यांच्या त्या जडणघडणीचा मला उपयोग होत आहे. वरून कठोर दिसणारे बाळासाहेब मृदू आणि प्रेमळ स्वभावाचे होते. आज त्यांच्या स्मृतीस्थळावर त्यांना नमन करताना जुन्या स्मृती व अनेक प्रसंग डोळ्यासमोरून गेले, अशी प्रतिक्रिया यावेळी दरेकर यांनी व्यक्त केली.

बाळासाहेबांप्रती कृतज्ञता व्यक्त करण हे आपले परम कर्तव्य आहे. बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असणारे सामाजिक बांधिलकीचे काम आणि बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा दिलेला विचार बळकट व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांनी काम करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, आज बाळासाहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त शिवाजी पार्कवरील स्मृतिस्थळावर येऊन राज्यातील विविध नेत्यांनी आणि मंत्र्यांनी अभिवादन केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सहकुटुंब बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आले होते. त्याशिवाय राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना नेते संजय राऊत, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, परिवहन मंत्री अनिल परब आणि महापौर किशोरी पेडणेकर आदींनी बाळासाहेबांना अभिवादन केलं.

 

संबंधित बातम्या:

बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी अब्दुल सत्तार म्हणाले, खैरे साहेबांचा आदेश जबाबदारीने पूर्ण करु

…तर हिंदुत्वाशी तडजोड झाली नसती, बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनी नारायण राणेंचे ट्विट

बाळासाहेबांनी सांगितलेल्या विचार आणि विधानांवरच शिवसेना चालत आहे, अनिल परबांचा फडणवीसांना टोला

(pravin darekar slams cm uddhav thackeray over hindutva)