दादांच्या कार्यकर्त्यांवर शंका पण पुण्यातील ‘या’ उमेदवाराला अडीच लाखांच्या मताधिक्क्याने विजयाचा विश्वास

| Updated on: May 21, 2024 | 2:11 PM

देशात एकूण सात टप्प्यात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होईल. शेवटचा टप्पा 1 जूनला होईल. त्यानंतर 4 जून रोजी निकाल जाहीर होईल. निकलाला अजून 14 दिवस बाकी आहेत. मात्र, त्याआधीच पुणे जिल्ह्यातील एका उमेदवाराने मोठ्या मताधिक्क्याने विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.

दादांच्या कार्यकर्त्यांवर शंका पण पुण्यातील या उमेदवाराला अडीच लाखांच्या मताधिक्क्याने विजयाचा विश्वास
महायुती
Follow us on

महाराष्ट्रात लोकसभेच्या सर्वच्या सर्व 48 मतदारसंघात मतदान पूर्ण झालय. काल पाचव्या टप्प्यात 13 लोकसभा मतदारसंघात मतदान झालं. हा महाराष्ट्रातील शेवटचा टप्पा होता. देशात एकूण सात टप्प्यात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होईल. शेवटचा टप्पा 1 जूनला होईल. त्यानंतर 4 जून रोजी निकाल जाहीर होईल. निकलाला अजून 14 दिवस बाकी आहेत. मात्र, त्याआधीच पुणे जिल्ह्यातील एका उमेदवाराने मोठ्या मताधिक्क्याने विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. मावळचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. हे बोलत असतानाच त्यांनी अजितदादांच्या कार्यकर्त्यांवर शंका सुद्धा व्यक्त केली.

“मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीची कुठेही ताकद नाही. मागचा निकाल, मतदारांचा कौल पाहता, माझा अडीच लाखापेक्षा जास्त मताधिक्क्याने विजय होईल. चिंचवड विधानसभा आणि पनवेल विधानसभा ही दोन मोठी महानगर आहेत. चिंचवडमध्ये मला लाखापेक्षा जास्त मताधिक्क्य मिळेल. त्याचवेळी पनवेलमध्ये 70 ते 80 हजारचा लीड मिळेल. समोरचा उमेदवार हे लीड तोडू शकणार नाही” असा विश्वास श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला.

‘…तर समोरच्या उमेदवाराच डिपॉजिट जप्त झालं असतं’

माझ्यासाठी अजित पवार आणि पार्थ पवार या दोघांनी काम केल्याच श्रीरंग बारणे यांनी कबूल केलं. “काही प्रमाणात राष्ट्रवादीतील तळागाळातील कार्यकर्ते सुरुवातीला दुखावलेले ती नाराजी तशीच राहिली. म्हणून काही मतदार वेगळ्या विचाराने जाऊ शकतो, ती नाराजी राहिली नसती, तर समोरच्या उमेदवाराच डिपॉजिट जप्त झालं असतं” असं श्रीरंग बारणे म्हणाले.