ना महत्त्वाचं पद, ना महत्त्वाची जबाबदारी, भाजपमधील दोन ‘साईडलाईन पाटील’ अमित शाहांच्या भेटीला!

| Updated on: Aug 11, 2021 | 11:49 AM

एकेकाळचे कट्टर काँग्रेस नेते पण दोन वर्षांपूर्वी भाजपवासी झालेले हर्षवर्धन पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी अमित शहा यांची भेट घेतली आहे. राजधानी नवी दिल्लीत ही भेट झाली आहे. हर्षवर्धन पाटील यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे.

ना महत्त्वाचं पद, ना महत्त्वाची जबाबदारी, भाजपमधील दोन साईडलाईन पाटील अमित शाहांच्या भेटीला!
राधाकृष्ण विखे पाटील आणि हर्षवर्धन पाटील यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली...
Follow us on

नवी दिल्ली :  एकेकाळचे कट्टर काँग्रेस नेते पण दोन वर्षांपूर्वी भाजपवासी झालेले हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) आणि राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shaha) यांची भेट घेतली आहे. राजधानी नवी दिल्लीत ही भेट झाली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वीच अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यानंतर दोन्ही पाटलांनी अमित शहा यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे.

भाजपमधील दोन ‘साईडलाईन पाटील’ अमित शाहांच्या भेटीला!

सध्या राज्यातील बहुतांश भाजप नेते नवी दिल्लीत आहेत. महाराष्ट्रातून नव्याने केंद्रीय मंत्री झालेल्या मंत्रीमहोदयांची राज्यातील भाजप नेते भेट घेत आहेत. या भेटीत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा, बैठका, पक्षासाठीचं येणाऱ्या काळातील प्लॅनिंग होत आहे. दोनच दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी अमित शहा यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीनंतर आता हर्षवर्धन पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी अमित शहा यांची भेट घेतलीय.

भेट का घेतली असावी?

हर्षवर्धन पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील यांचं वर्णन भाजपमधील दोन ‘साईडलाईन पाटील’ असं करावं लागेल. सध्या हर्षवर्धन पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे भाजपचं ना कुठलं मोठं पद आहे ना कुठली जबाबदारी…  बरं त्यांच्या भाजप प्रवेशाला आता दोन-अडीज वर्ष उलटून गेली आहेत. पण भाजपमध्ये त्यांना म्हणावं असं स्थान नाही किंवा त्यांच्या राजकीय कारकीर्दीला शोभेल असं पद नाही.

राधाकृष्ण विखे पाटील आणि हर्षवर्धन पाटील यांनी एकाच कारणासाठी भाजप सोडलीय. हे कारण आहे… हर्षवर्धन पाटील यांच्या जागेचा वाद तर सुजय विखे यांचं तिकीट…! काँग्रेसला रामराम ठोकताना दोघांचाही राष्ट्रवादीवर रोष होता. भाजपमध्ये प्रवेश करताना मोठ्या सन्मानाने त्यांना प्रवेश दिला गेला. काही आश्वासने दिली गेली. कारण त्यावेळी राज्यात भाजपची सत्ता येणार, अशी परिस्थिती होती. पण निवडणुकीनंतर राज्यातलं राजकारण बदललं आणि महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं.

आता आजच्या परिस्थितीला दोन्ही पाटील भाजपमधून साईडलाईन झालेत. त्यामुळे पक्षप्रवेश करताना त्यांना दिलेल्या आश्वासनाचं काय? असा प्रश्न उरतोच… याच विषयांवर अमित शहा यांच्याशी चर्चा झाली असावी, अशी शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.

वास्तविक दोन्ही नेते मोठे आहेत. त्यांची क्षमता आणि राजकारणाची स्टाईल निराळी आहे. काँग्रेसमध्ये पहिल्या फळीचे नेते राहिले होते. मंत्रीपदाचा मोठा अनुभव गाठीशी आहे. प्रशासन कसं चालवायचं, याची मेख त्यांना माहिती आहे. पण हे सगळं असूनही गेल्या दोन वर्षात भाजपमध्ये मात्र त्यांना म्हणावी अशी संधी मिळत नाही. कदाचित याच भावना त्यांनी अमित शहांसमोर व्यक्त केल्या असाव्यात, असं राजकीय जाणकार सांगतात.

हे ही वाचा :

RR आबांकडून डान्सबारविरोधी कायदा, मनजितसिंग म्हणाला, ‘आता आमदारांच्या बायकांनाच नाचवू’, ‘भाऊ-आबांनी’ त्याचा ‘करेक्ट कार्यक्रम’ केला!

काँग्रेस आमदारांच्या स्विमिंग पूलमध्ये डुबक्या, धोतरं छत्रीवर वाळत, TV पाहून सोनियांचा विलासरावांना फोन, वाचा काय आहे किस्सा…

Special Story : जेव्हा हर्षवर्धन पाटील यांनी महाराष्ट्राचं विधिमंडळ जळण्यापासून वाचविले…!