काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झालीय. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करुन राहुल गांधींनी नांदेडच्या देगलूर येथे महाराष्ट्रातील पहिली सभा घेतली. राहुल गांधींची ही यात्रा कन्याकुमारी ते जम्मू काश्मीर अशी आहे. ही यात्रा महाराष्ट्रात पुढचे दिवस असणार आहे. त्यांनी आज नांदेडमधील गुरुद्वारमध्ये जाऊन दर्शन घेतलं. राहुल गांधींची 18 नोव्हेंबरला बुलढाणा जिल्ह्यातील शेगांव येथे जाहीर सभा होईल. त्यांच्या यात्रेविषयी सविस्तर माहिती देणारा टीव्ही 9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट!