एवढे चालूनही चेहऱ्यावरचा ग्लो का कमी होत नाही?; ‘त्या’ प्रश्नावर राहुल गांधी यांनी दिलं मजेदार उत्तर

| Updated on: Oct 17, 2022 | 5:14 PM

सध्या भारत जोडो यात्रा कर्नाटकात आहे. आज काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूकही आहे. यात्रेत सामील असलेल्या नेत्यांनी कर्नाटकातच मतदान केलं.

एवढे चालूनही चेहऱ्यावरचा ग्लो का कमी होत नाही?; त्या प्रश्नावर राहुल गांधी यांनी दिलं मजेदार उत्तर
'त्या' प्रश्नावर राहुल गांधी यांनी दिलं मजेदार उत्तर
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

बेल्लारी: काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो (Bharat Jodo Yatra) यात्रा सुरू आहे. या यात्रेत राहुल गांधी (Rahul Gandhi) रोज 14 ते 15 किलोमीटर पदयात्रा करत आहेत. रस्त्यामध्ये थांबून लोकांशी चर्चा करत आहेत. थकल्यावर नाक्यावर बसून नागरिकांशी चाय पे चर्चा करत आहेत. वाटेत फूटबॉल खेळणारी मुलं दिसली की थांबून एक दोन किक मारून पुढे जात आहेत. राहुल गांधी यांच्या या भारत यात्रेचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहते. मात्र, फावल्यावेळी राहुल गांधी काय करतात? रात्री काँग्रेसचे (congress) कार्यकर्ते आराम करत असताना काही पत्रकारांनी राहुल गांधींना गाठलं. त्यांच्याशी चर्चा केली. रिकाम्यावेळी तुम्हा काय करता असं त्यांना विचारलं अन् चर्चेचा सिलसिला सुरू झाला.

फावल्या वेळेत तुम्ही काय करता? असा सवाल करण्यात आल्यानंतर राहुल गांधी थोडे हसले. यात्रेतून जो वेळ मिळतो, त्यावेळेत मी एक्सरसाईज करतो. पुस्तके वाचतो. आई, बहीण आणि मित्रांशी फोनवरून गप्पा मारतो. तू काय करतेस? असं आईला विचारत असतो, असं राहुल गांधी म्हणाले.

हे सुद्धा वाचा

त्यानंतर एका कार्यकर्त्याने त्यांना यात्रे दरम्यान थोडं हळू चालण्याचा आग्रह केला. तुम्ही हळू चालला तर बाकीच्यांना तुमच्यासोबत चालणं सोपं जाईल, असं हा कार्यकर्ता म्हणाला. तुमच्या चेहऱ्यावर टॅनिंग दिसत नाही. तुम्ही कोणती सनस्क्रीन वापरता? असा सवालही एका कार्यकर्त्याने विचारला.

त्यावर राहुल गांधी यांनी टी-शर्ट हटवून हात दाखवला. त्वचा टॅनिंग झाल्याचं सांगितलं. पण आपण सनस्क्रीनचा वापर करत नाही. आईने सनस्क्रीन पाठवली आहे. पण मी वापरत नाही, असं ते म्हणाले. स्लो चालण्याच्या आग्रहावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

आम्ही पहाटे 6.30 वाजता यात्रा सुरू करतो. 11.30 किंवा दुपारी 12 वाजेपर्यंत चालतो. आम्ही स्लो चाललो तर कडाक्याचं ऊन लागेल, असं ते म्हणाले. तुम्ही भारत जोडो यात्रा एन्जॉय करत आहात ना? असा सवाल राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांना विचारला. त्यावर सर्वांनी हो असं म्हटलं.

सध्या भारत जोडो यात्रा कर्नाटकात आहे. आज काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूकही आहे. यात्रेत सामील असलेल्या नेत्यांनी कर्नाटकातच मतदान केलं. बेल्लारीत पोलिंग बूथ तयार करण्यात आले होते. यावेळी त्यांनी बेल्लारीच्या जनतेशी संवाद साधला. बेल्लारीशी काँग्रेसचं आणि गांधी घराण्याचं असलेलं नातं सांगितलं.

माझ्या आईने इथून निवडणूक लढवली होती. त्या विजयी झाल्या होत्या. 1999 मध्ये सोनिया गांधी यांनी बेल्लारीतून पहिल्यांदा निवडणूक लढवली होती. त्यांच्या विरोधात भाजपने सुषमा स्वराज यांना उभं केलं होतं. अत्यंत चुरशीची ही निवडणूक झाली होती. मात्र, त्यात सोनिया गांधी विजयी झाल्या होत्या.