Nitesh Rane : अतिरेक्यांच्या मतदानामुळे राहुल गांधींची बहीण निवडून आली – नितेश राणे

| Updated on: Dec 30, 2024 | 1:18 PM

Nitesh Rane : "ज्या देशात 85 टक्के हिंदू राहतात,आमच्या नसा नसात छत्रपती शिवाजी महाराज आहेत, मग त्या महाराष्ट्रात त्या देशात आम्ही अफजलखानाच्या वधाचे पोस्टर लावायचे नाहीत ? मग पाकिस्तानमध्ये लावणार का ?" असा सवाल नितेश राणे यांनी केला.

Nitesh Rane : अतिरेक्यांच्या मतदानामुळे राहुल गांधींची बहीण निवडून आली - नितेश राणे
nitesh rane
Follow us on

हिंदुत्वाच्या विषयावर आक्रमकपणे बोलताना कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी आतापर्यंत अनेकदा प्रक्षोभक वक्तव्य केली आहेत. त्यांच्या वक्तव्यावरुन अनेकदा वाद निर्माण झाले आहेत. आमदार नितेश राणे आता महाराष्ट्र सरकारमध्ये मस्त्य आणि बंदर खात्याचे मंत्री आहेत. सलग तिसऱ्यांदा मोठ्या मताधिक्क्याने विधानसभेची निवडणूक जिंकून त्यांनी विधान भवनात प्रवेश केला आहे. आता नितेश राणे यांनी केलेल्या एका वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला आहे. केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

“राहुल गांधींना आणि प्रियंका गांधींना अतिरेकी मतदान करतात. अतिरेकींना धरून ते खासदार झालेत” असं वादग्रस्त वक्तव्य नितेश राणे यांनी केलं. “अफजल खान वधाचा भव्य असा कार्यक्रम आयोजित केला. या गोष्टीला शुभेच्छा देण्यासाठी मी आवर्जून येथे उपस्थित राहिलो. स्थानिक पोलिसांनी विजय शिवतारे यांच्यापाशी मला निरोप दिला की, मी इथे प्रक्षोभक वक्तव्य करू नये” असं नितेश राणे म्हणाले.

‘कोणाला इशारा देण्याची गरज नाही’

“आमच्या राज्यात हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आलेलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री ज्यांचं रक्त भगवं आहे, ते कडवट हिंदुत्ववादी आहेत. त्यामुळे आम्हाला आता टोकाची भाषणे आणि कोणाला इशारा देण्याची गरज नाही” असं नितेश राणे म्हणाले. “आता आम्ही टोकाची भाषणे द्यायला लागलो, तर लोकच आम्हाला विचारतील तुमचे सरकार आहे, त्यामुळे आता आम्हाला असं काय करावं लागणार नाही” असं नितेश राणे म्हणाले.

अफजलखानाच्या वधाचे पोस्टर मग पाकिस्तानमध्ये लावायचे का?

“जो कायदा अन्य धर्मियांना लागतो, तोच कायदा हिंदू धर्माला लागतो. कायद्याच्या चौकटीत सगळं काम हेच आम्हाला अपेक्षित आहे. जे सगळे कायदे अन्य लोकांना लावता, तोच कायद्या आम्हाला लावा. अफजल खान वधाचा पोस्टर तुम्ही लावू नका, यातून भावना दुखवतील असा स्थानिक प्रशासनाकडून सांगण्यात आलं” असं नितेश राणे म्हणाले. “ज्या देशात 85 टक्के हिंदू राहतात,आमच्या नसा नसात छत्रपती शिवाजी महाराज आहेत, मग त्या महाराष्ट्रात त्या देशात आम्ही अफजलखानाच्या वधाचे पोस्टर लावायचे नाहीत ? मग पाकिस्तानमध्ये लावणार का ?” असा सवाल त्यांनी केला.

त्यांनी दाढी कुरवाळावी

“चार-दोन टकल्यांच्या भावना दुखवणार असतील, तर मग त्यांनी पाकिस्तान, बांगलादेश येथे जाऊन दाढी कुरवाळावी. आमच्या राज्यात कोणीही गोहत्या करू शकत नाही, मग कायदा मोडत असेल, त्याबद्दल आम्ही भूमिका घाययची नाही का?” असा सवाल नितेश राणे यांनी विचारला. “केरळ हे मिनी पाकिस्तान म्हणून राहुल गांधींची बहीण तिथे निवडून येते, सगळे अतिरेकी त्यांना मतदान करतात. अतिरेकी लोकांना धरूनच हे लोक खासदार झालेले आहेत” असा धक्कादायक आरोप नितेश राणे यांनी केला.