बेंगळुरू: काँग्रेस नेते राहुल गांधी (rahul gandhi) यांनी पुन्हा एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (rss) आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सावरकर (veer savarkar) यांनी ब्रिटिशांना मदतच केली होती, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सध्या भारत जोडो यात्रा सुरू आहे. ही यात्रा आज कर्नाटकात पोहोचली. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मीडियाशी संवाद साधला असता त्यांनी हा आरोप केला. राहुल गांधी यांच्या या आरोपावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये जुंपण्याची चिन्हे दिसत आहेत.
संघ आणि सावकरकरांनी इंग्रजांना मदतच केली. सावरकरांना तर इंग्रजांकडून पैसे मिळत होते, अशी टीका करतानाच काँग्रेसनेच स्वातंत्र्याची लढाई लढली, असं राहुल गांधी म्हणाले.
यावेळी त्यांनी पीएफआयच्या मुद्द्यावरही भाष्य केलं. द्वेष पसरविणारा व्यक्ती कोण आहे याने काही फरक पडत नाही. तो कोणत्या समुदायातून येतो याचाही फरक पडत नाही. द्वेष आणि हिंसा पसरविणे हे राष्ट्रविरोधी काम आहे. आम्ही अशा लोकांच्या विरोधात लढू, असं त्यांनी सांगितलं.
LIVE: Shri @RahulGandhi addresses media amid Karnataka leg of the #BharatJodoYatra. https://t.co/9yyDUrZwuZ
— Congress (@INCIndia) October 8, 2022
लोकव्यवहारावर हल्ला केला जात असल्याने आम्ही नव्या शिक्षण धोरणाला विरोध करत आहोत. आमच्या इतिहासाचं विकृतीकरण केलं जात आहे. नवं शिक्षण धोरणातून काही लोकांच्या हाती शक्ती एकवटण्याचा प्रयत्न आहे. ज्यातून आमची संस्कृती दिसेल अशी विकेंद्रीत शिक्षण प्रणाली आम्हाला हवी आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
प्रत्येक भाषा महत्त्वाची आहे. आम्ही सर्वच भाषांचा सन्मान करतो. संविधानाने सर्वांना अधिकार दिला आहे, असं त्यांनी सांगितलं. फक्त हिंदी भाषेलाच राष्ट्रीय भाषा करण्याचा इरादा नाही. तसेच तुमच्या कोणत्याही भाषेवर कोणतंही आक्रमण होणार नाही, असं माजी मंत्री प्रियांका खडगे यांनी सांगितलं.