मुंबई : काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांचं ट्विटर अकाऊंट तात्पुरतं सस्पेंड करण्यात आलं. या मुद्द्यावरुन मुंबईत काँग्रेस आमदार झिशान सिद्दिकी यांच्या नेतृत्वात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केलं. बीकेसीतील ट्विटरच्या कार्यालयाबाहेर हे आंदोलन करण्यात आलं. त्यावेळी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्रातील भाजप सरकार विरोधात जोरदार नारेबाजी केली. तसंच राहुल गांधी जिंदाबादच्या घोषणाही दिल्या. केंद्र सरकारच्या दबावामुळे ट्विटरने राहुल गांधी यांचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड केल्याचा आरोप युवक काँग्रेसनं केलाय. (Youth Congress agitation led by MLA Zeeshan Siddiqui)
आमदार झिशान सिद्दिकी यांच्या नेतृत्वात बीकेसीतील ट्विटरच्या कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जमा झाले होते. कार्यकर्त्यांना अडवण्यासाठी पोलिसांनी बॅरिकेटिंगही केलं होतं. मात्र, बॅरिकेट्स तोडून कार्यकर्ते ट्विटरच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे अखेर पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. आंदोलन सुरु असताना मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगतापही पोहोचले. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आंदोलन अधिकच तीव्र केलं. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
राहुल गांधी यांनी दिल्लीतील बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी पीडितेच्या आई-वडिलांचा फोटो ट्वीट केला होता. त्याला भाजपकडूनही आक्षेप घेण्यात आला होता. तर एका वकिलाने पीडितेच्या कुटुंबाची ओळख जगजाहीर होत असल्यानं या फोटोला आक्षेप घेत दिल्ली पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानंतर ट्विटरनं राहुल गांधी यांचं ते ट्वीट हटवलं होतं. मात्र, आता त्यांचं ट्विटर अकाऊंट तात्त्पुरतं सस्पेंड करण्यात आलं.
दरम्यान, ट्विटर उकाऊंट सस्पेंड केल्यानंतर राहुल गांधी इन्स्टाग्रामवर अॅक्टिव्ह झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, ट्विटर उकाऊंट तात्त्पुरतं सस्पेंड केल्यानंतर ट्विटरने राहुल गांधींना त्यांचं मत ठेवण्यास सांगितलं होतं. त्यानंतर काँग्रेसकडून ट्विटरला उत्तर पाठवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
Shri @RahulGandhi’s Twitter account has been temporarily suspended & due process is being followed for its restoration.
Until then, he will stay connected with you all through his other SM platforms & continue to raise his voice for our people & fight for their cause. Jai Hind!
— Congress (@INCIndia) August 7, 2021
नांगल येथे एका मुलीवर बलात्कार झाला होता. या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर राहुल गांधी यांनी त्यांचा फोटो ट्विट केला होता. विनीत जिंदल या वकिलाने त्याला आक्षेप घेत दिल्ली पोलिसांकडे तक्रार केली होती. राहुल गांधी यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून मुलीच्या आईवडिलांचा फोटो शेअर केला आहे. त्यामुळे पीडितेच्या कुटुंबीयांची ओळख पटली आहे. त्यामुळे या प्रकरणी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, असं जिंदल यांनी तक्रारीत म्हटलं आहे.
संबंधित बातम्या :
राहुल गांधी यांचं ‘ते’ ट्विट ट्विटरने हटवले; वकिलाच्या तक्रारीनंतर कारवाई
Youth Congress agitation led by MLA Zeeshan Siddiqui