महाराष्ट्र : राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ओबीसी समाजाचा (OBC community) अपमान केल्याचं सांगत परभणी (Parbhani) शहरात लागोपाठ दुसऱ्या दिवशी भाजपकडून राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलन सुरु आहे. काल भाजप महानगरकडून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर येथे राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन करण्यात आले होते. आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेट समोर भाजप ग्रामीण कडून आंदोलन करण्यात आले. यावेळी राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
अहमदनगरला शेगाव येथे भाजपच्यावतीने काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांचे नेतृत्वात राहुल गांधी यांची प्रतिकारक अंत्ययात्रा काढण्यात आली. शेवगाव शहरातील क्रांती चौकातून या अंत्ययात्रेला सुरुवात करण्यात आली होती. तसेच राहुल गांधी यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी वादग्रस्त विधान केल्याने तसेच ओबीसींच्या विरोधात अपमान जनक वक्तव्य केल्यामुळे निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणाबाजी ही करण्यात आली आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वादग्रस्त वक्तव्य करून समस्त ओबीसी समाजाचा अपमान केल्याचा आरोप करत मालेगावला भाजपने आक्रमक भूमिका घेऊन राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केले. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत राहुल गांधी यांचे फोटो फाडून त्यांचा निषेध केला. राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाची जाहीर माफी मागावी अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली आहे.
“सर्व चोरांचे नाव मोदी कसे काय असते” असे वक्तव्य राहुल गांधींनी २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत कर्नाटकच्या प्रचार सभेत केले होते. राहुल गांधी यांनी मोदी या अडणावावरून अपमानास्पद टिप्पणी करतांना ओबीसी समाज बांधवांचा अपमान केला. त्यामुळे न्यायालयाने या बद्दल राहुल गांधींना दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने दिलेली शिक्षा मान्य करण्याऐवजी काँग्रेस नेते रस्त्यावर आंदोलने करत आहेत. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा अपमान करत असलेल्या काँग्रेस व राहुल गांधी यांचा निषेध करत, आज बुलढाण्याच्या जयस्तंभ चौकात निषेध करण्यात आला. यावेळी भाजपा पदाधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.