मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्यावर सर्वच क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी त्यांना हटके शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भविष्यात पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घ्यावीत, अशा शुभेच्छा राहुल शेवाळे यांनी दिल्या आहेत. (rahul shewale greets Maharashtra CM Uddhav Thackeray on birthday)
खासदार राहुल शेवाळे यांनी एका दैनिकामध्ये लिहिलेल्या एका लेखातून ही इच्छा व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आजवरचा प्रवास, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरेंनी सांभाळलेली शिवसेना, पेललेली आव्हानं याचा धांडोळा या लेखात घेण्यात आला आहे. दक्षिण आणि उत्तरेतील राज्यांतील जनतेला आपलेसे वाटू शकेल असे नेतृत्त्व उद्धव ठाकरे यांचे असल्याने, ‘दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा’ हे तमाम मराठी जनतेचं स्वप्न साकार करावं. त्यांनी भविष्यात पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घ्यावीत, असं शेवाळे यांनी म्हटलं आहे.
कोरोना संकटात महाराष्ट्राची उल्लेखनीय कामगिरी आणि त्याची विविध यंत्रणांनी घेतलेली दखल याविषयी शेवाळे यांनी भाष्य केलं आहे. तसेचकेंद्र सरकारकडून कोरोना परिस्थिती हाताळण्यात झालेल्या दिरंगाईवरही त्यांनी टीका केली. उत्तम छायाचित्रकार असल्याने नेमका कोणता क्षण टिपायचा आणि चांगले नेमबाज असल्याने नेमका निशाणा कुठे आणि कधी साधायचा? याचा अचूक अंदाज उद्धव ठाकरे यांना असल्याचं सूचक विधानही त्यांनी केलं आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनीही उद्धव ठाकरे देशाचं नेतृत्व करतील असं म्हटलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रत्येकाला आपला कुटुंब प्रमुख वाटतात. हे त्यांच्या नेतृत्वाचं यश आहे. घरातला माणूस नेतृत्व करतो, असं प्रत्येकाला वाटतं. हे नेतृत्व प्रदीर्घ काळ टिकेल. राष्ट्रालाही त्यांच्या संयमी, प्रखर राष्ट्रवादी आणि हिंदुत्वावादी नेतृत्वाची गरज आहे. ते देशाला नेतृत्व देतील, अशा शुभेच्छा मी त्यांना देतो, असं राऊत म्हणाले. (rahul shewale greets Maharashtra CM Uddhav Thackeray on birthday)
VIDEO | 100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 27 July 2021 https://t.co/sqxBpGWtHj #MorningBulletin | #MorningHeadlines | #TV9Marathi | #BreakingNews | #LatestUpdates
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 27, 2021
संबंधित बातम्या:
केंद्र सरकार आमचा बाप आहे, केंद्रातील मंत्र्यांनी दोन हजार कोटींचा चेक घेऊन यावा: संजय राऊत
Maharashtra Rain LIVE | पुणे शहर आणि जिल्ह्यात 489.45 मिमी पाऊस, सर्वाधिक पाऊस मावळ तालुक्यात
(rahul shewale greets Maharashtra CM Uddhav Thackeray on birthday)