बाळासाहेबांनी वारसदार का म्हटलं? राज ठाकरे म्हणाले…

| Updated on: Jan 08, 2023 | 12:23 PM

कोणाकडे बघितले की घंटी वाजते. त्यानंतर व्यंगचित्र काढण्याची सुरुवात होते. पण राज्यातील आजची परिस्थिती पाहिली तर घंटी वाजत नाही तर घंटा वाजू लागते

बाळासाहेबांनी वारसदार का म्हटलं? राज ठाकरे म्हणाले...
नाशिकमध्ये ठाकरे गटालाच नव्हे, मनसेलाही खिंडार, अमित ठाकरे नाशकात असतानाच पक्षात फूट
Follow us on

पुणे : पुण्यात झालेल्या १८ व्या जागतिक मराठी संमेलनात व्यंग, वास्तव, राजकारण या विषयांवर राज ठाकरे (raj thackeray) यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. त्या मुलाखतीत व्यंगचित्रावर (caricature)बोलताना आजच्या राजकारणांवर राज ठाकरे यांनी बोट ठेवले. त्यांनी राजकारण्यांनी अनेक व्यंगात्मक फटकारे लागावले. त्याचबरोबर माध्यमांनाही त्यांनी चार गोष्टी सुनावल्या.

मुलाखातीच्या सुरवातीला मनसे प्रमुख राज ठाकरे यांना “तुमच्यात बाळासाहेबांनी असं काय पाहिलं की तुम्हाला व्यंगचित्रकार म्हणून वारसदार म्हटलं?” असा प्रश्न विचारला. यावर राज ठाकरेंनी हजर जबाबीपणाने मिश्किलपणे उत्तर दिलं. राज म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे मला त्यांचा व्यंगचित्रकार म्हणून वारसदार का म्हटले हे आता मला त्यांना विचारता येणार नाही.” या उत्तरानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

हे सुद्धा वाचा

व्यगंचित्र कसे शिकले : 
आपण व्यंगचित्र वडील आणि बाळासाहेबांकडून शिकलो. बाळासाहेबांनी जे सल्ले दिले त्यानुसार व्यंगचित्र काढत गेलो. सात ते आठ तास अभ्यास करत गेलो. बाळासाहेबांनी सांगितले होते की, जे समोर दिसेल ते काढ. त्यानंतर जे समोर दिसेल ते उतरवत गेलो. मुद्रीत माध्यमांमध्ये व्यंगचित्र प्रसिद्ध होण्याची मजा काही तरी वेगळी होती. सोशल मीडियावर ती मजा नाही.

राजकीय परिस्थितीमुळे घंटा वाजतात :
राजकीय व्यंगचित्र काढताना समोर चेहरा आले की दिसावे लागते. कोणाकडे बघितले की घंटी वाजते. त्यानंतर व्यंगचित्र काढण्याची सुरुवात होते. पण राज्यातील आजची परिस्थिती पाहिली तर घंटी वाजत नाही तर घंटा वाजू लागते, अशा षटकार आजच्या राजकीय परिस्थितीवर राज ठाकरे यांनी मारला.

माध्यमांवर राजकीय चर्चा बंद करा :
माध्यमांनी महत्वाचे प्रश्न सोडून फक्त राजकारणावर चर्चा होते. राजकारणावर चर्चा बंद करुन राज्यातील शेती, शेतकरी, ग्रामीण भाग आणि तळागळातील लोकांचे प्रश्न मांडायला हवे. पण राऊत काय बोलला आणि पवार काय बोलले, याच बातम्या दिल्या जातात. हे सर्व बंद करायला हवे. ही कोणती पत्रकारिता आहे आपणास कळत नाही, असे राज ठाकरे म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर काय म्हणाले…: 
देशातील एखाद्या राज्याला महत्व दिले जात आहे. हे सर्वात आधी मी म्हटले होते. त्यांनी देशाचा विचार करायला हवे. परंतु फक्त गुजरातचा विचार केला जातो. हा प्रश्न सर्वात आधी मी मांडला. त्यानंतर त्यावर शहामृगसारखे झाले.

चांगले ते चांगले :
जे चांगले आहे. त्याचे कौतूक करतो. मोदी यांनी राम मंदिराचा प्रश्न सोडवलाय. त्यांनी काश्मीरचा प्रश्न सोडवला. त्यामुळे त्याचे कौतूक केले. परंतु जेथे चुकत आहे, तेथे स्पष्ट विरोध केलाय. मी जे चांगले आहे त्याला चांगले म्हणणार आणि जे वाईट आहे त्याला वाईट म्हणाणार आहे. परिस्थितीनुसार निर्णय घ्यावे लागतात. राजकारण परिवर्तनशील आहे, हे समजले पाहिजे.