मुलाचं लग्न लावलं, आता राज ठाकरे 500 आदिवासी जोडप्यांचं लग्न लावणार

| Updated on: Jul 05, 2019 | 4:29 PM

पालघर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांचं फॅशन डिझायनर मिताली बोरुडे हिच्याशी लग्न झालं. हा विवाहसोहळा गेल्याच महिन्यात म्हणजे 27 जानेवारीला पार पडला. या लग्नाच्या धावपळीतून काहीसे निवांत झालेले राज ठाकरे पुन्हा लग्नाच्या धावपळीत अडकणार आहेत. पालघर जिल्ह्यातील 500 आदिवासी जोडप्यांचा सामूहिक विवाहसोहळा आयोजित करण्यात आला आहे. येथे राज […]

मुलाचं लग्न लावलं, आता राज ठाकरे 500 आदिवासी जोडप्यांचं लग्न लावणार
Follow us on

पालघर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांचं फॅशन डिझायनर मिताली बोरुडे हिच्याशी लग्न झालं. हा विवाहसोहळा गेल्याच महिन्यात म्हणजे 27 जानेवारीला पार पडला. या लग्नाच्या धावपळीतून काहीसे निवांत झालेले राज ठाकरे पुन्हा लग्नाच्या धावपळीत अडकणार आहेत. पालघर जिल्ह्यातील 500 आदिवासी जोडप्यांचा सामूहिक विवाहसोहळा आयोजित करण्यात आला आहे. येथे राज ठाकरे आणि पत्नी शर्मिला ठाकरे उपस्थित राहणार आहेत.

पालघर जिल्ह्यातील दुर्गम भागातील गरीब, शेतकरी, मजदूर आणि आदिवासी समाजातील 500 जोडप्यांचा विवाहसोहळा आयोजित करण्यात आला आहे. येत्या 9 फेब्रुवारी रोजी पालघर जिल्ह्यातील बोईसर येथील खैरेपाडा मैदानात हा सामूहिक विवाहसोहळा पार पडणार आहे.

या सामूहिक विवाहसोहळ्यात आदिवासी समाजातील 500 जोडप्यांना आशीर्वाद देण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे उपस्थित राहणार आहेत.

अमितचा विवाहसोहळा

‘राज’पुत्र अमित ठाकरे याचं फॅशन डिझायनर मिताली बोरुडे हिच्या लग्न झालं. 27 जानेवारी रोजी मुंबईतील परेलमध्ये विवाहसोहळा पार पडला. यावेळी राजकारण, सिनेमा, क्रीडा, उद्योग यांसह विविध क्षेत्रातील देशभरातून नामवंत व्यक्तींनी हजेरी लावून, अमित-मितालीला आशीर्वाद दिले. राज ठाकरे राजकीय क्षेत्रात आक्रमक भूमिका घेत असले, तरी त्यांचा वैयक्तिक मित्रपरिवार प्रचंड मोठा आहे. त्याचाच प्रत्यय अमित ठाकरेच्या लग्नात आला.