बार्शी : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज विधानसभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारवर जोरदार हल्ला चढवला. अवैध धंद्याविरोधात लोकप्रतिनिधी पुराव्यानिशी मुद्दे मांडत आहेत म्हणून त्यांना टार्गेट करण्यात येत असेल तर ही चुकीची गोष्ट असल्याचे सांगत पोलीस निरीक्षकाबाबत काही गोष्टी त्यांनी उपस्थित केल्या. तर अशा गोष्टी होत असतील तर तर बार्शीच्या त्या पीआय विरोधात मी स्वत: हजारोचा मोर्चा काढेन असा इशारा फडणवीस यांनी दिलाय. बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांचा मुलगा रणवीरला फसवण्यात येत असल्याचा आरोप फडणवीसांनी केलाय. याबाबत आम्ही रणवीरची प्रतिक्रिया जाणून घेतली असता रणवीरने बार्शीतील विदारक स्थिती विधानसभेत मांडल्यावर फडणवीस यांचे आभार मानले आहेत.
माजी मंत्री दिलीप सोपल यांचे समर्थक भाऊसाहेब आंधळकर यांनी फेसबुक लाईव्हद्वारे आपल्याला धमकावलं असल्याचा आरोप रणवीर राऊतने केलाय. फेसबुक लाईव्हद्वारे पुण्यातील गँगवॉर, मुंबईतील गँगवॉरमार्फत तुम्हाला संपवू अशा वारंवार धमक्या आंधळकर यांनी दिल्या. याचे सर्व पुरावे आम्ही पेनड्राईव्हद्वारे पोलीस अधीक्षक कार्यालय, पोलीस निरीक्षक कार्यालय यांना वारंवार पत्र व्यवहार करतोय. जीवाला धोका असल्यानं वारंवार मी पैसे भरुन पोलीस संरक्षण देण्याची मागणी वर्षभरापासून करत आहे. मात्र, आपल्या मागणीचा गंभीरपणे विचार केला जात नसल्याचं रणवीर राऊतने सांगितलं.
बार्शीतील माजी आमदार आणि माजी मंत्री दिलीप सोपल, शिवसेना नेते भाऊसाहे आंधळकर तसंच काही आरटीआय कार्यकर्ते बार्शीतील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचबोरबर हे सर्वजण षडयंत्र रचून माझ्यावर हल्ला करून, मलाच 302 किंवा 307 सारख्या कलमांतर्गत गुंतवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे मला तत्काळ पोलीस संरक्षण देण्यात यावं अशी मागणीही रणवीरने केली आहे.
आमदार राजेंद्र राऊत यांच्या मुलाला फसवण्याचाही प्रकार घडण्याची शक्यता आहे. या पोलीस निरीक्षकांबाबत मी स्वतः तक्रार करुनही त्यांच्याविरोधात कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. बार्शीच्या पोलीस निरीक्षकाबद्दल गृहमंत्र्यांनी एकदा आपल्या छातीवर हात ठेऊन खरं काय ते सांगावं. राज्यात सगळ्या चुकीच्या घटना घडत असून लोकप्रतिनिधींवर जर पोलिसांकडून दंडूकेशाही चालवली जात असेल तर ती चुकीची आहे, आणि त्यासाठी मी स्वतः तिथे जाऊन हजारोंच्या संख्येने मोर्चा काढेन असा इशाराच फडणवीसांनी दिलाय.
इतर बातम्या :