Rajesh Tope on Anil Parab ED Raid | 'लोकशाहीत कारवाईसंदर्भात भेदभाव होत आहे

Rajesh Tope on Anil Parab ED Raid | ‘लोकशाहीत कारवाईसंदर्भात भेदभाव होत आहे

| Updated on: May 26, 2022 | 3:28 PM

अनिल परब यांच्या वर केलेल्या इडीच्या कारवाईवर राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्राने कधीच बदलेखोरीचं राजकारण केलेलं नाही त्याची अनुभूती येऊ नये असं देखील राजेश टोपे यावेळी म्हणाले आहेत.

शिवसेना नेते आणि मंत्री अनिल परब यांच्यावर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून गुन्हा दाखल झाला आहे. त्याचसोबत शासकीय निवासस्थानासह 7 ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. अनिल परब यांच्या संबंधित असलेले त्याचे निकटवर्तीय ही ईडीच्या जाळ्यात अडकले आहेत. मुंबई, पुणे, रत्नागिरी याठिकाणी ईडीने छापेमारी केली आहे. त्यामुळे शिवसेनेला धक्का बसला आहे. तर राजेश टोपे यांनी यावेळी भेदभाव करणं हा प्रकार जाणवतो अशी खंत व्यक्त केली आहे. महाराष्ट्राने कधीच बदलेखोरीचं राजकारण केलेलं नाही त्याची अनुभूती येऊ नये असं देखील राजेश टोपे यावेळी म्हणाले आहेत.

Published on: May 26, 2022 03:21 PM