Rajya Sabha Election Result : राज्यसभा पराभवानंतर शिवसेनेचं चिंतन, मुख्यमंत्री ठाकरेंची एकनाथ शिंदे, राऊत, परबांसोबत खलबतं, विधानपरिषदेसाठी ठरणार रणनीती

| Updated on: Jun 11, 2022 | 7:29 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर खलबतं सुरु झाली आहेत. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आता शिवसेनेचं चिंतन सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.

Rajya Sabha Election Result : राज्यसभा पराभवानंतर शिवसेनेचं चिंतन, मुख्यमंत्री ठाकरेंची एकनाथ शिंदे, राऊत, परबांसोबत खलबतं, विधानपरिषदेसाठी ठरणार रणनीती
उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या (Rajya Sabha Election) मैदानात भाजपनं महाविकास आघाडीला धोबीपछाड केलं. राज्यसभेच्या सहा जागांपैकी भाजपनं तीन जागा जिंकल्या आहेत. तर महाविकास आघाडीला तीन जागांवर समाधान मानावं लागलं. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून कोल्हापूरच्या संजय पवार (Sanjay Pawar) यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं होतं. तर भाजपनंही कोल्हापूरचेच धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली होती. 10 जून रोजी मोठ्या राजकीय घडामोडीनंतर 11 जून रोजी पहाटे निकाल लागला आणि धनंजय महाडिकांनी मैदान मारलं. या पराभव शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केलीय. त्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर खलबतं सुरु झाली आहेत. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आता शिवसेनेचं चिंतन सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.

संजय राऊतांकडून शरद पवारांची भेट

खासदार संजय राऊत यांनी काही वेळापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची सिल्व्हर ओकवर जात भेट घेतली. त्यावेळी मी राज्यसभा निवडणुकीत विजय झालो आहे. त्यामुळे शरद पवार यांचे आशीर्वाद घेण्यासाठी गेलो होतो असं राऊतांनी सांगितलं. तसंच राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेवर झालेल्या पराभवाबाबत पवारांशी चर्चा झाली, कुठे दगाफटका झाला? आपण का जिंकू शकलो नाहीत, त्याची कारणं काय? याबाबत चर्चा झाली. तसंच विधान परिषद निवडणुकीबाबतही चर्चा झाल्याचं शरद पवार यांनी सांगितलं. पवार यांच्या भेटीनंतर संजय राऊत वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहेत.

विधान परिषद निवडणुकीची रणनिती ठरणार?

वर्षावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होत असलेल्या बैठकीला संजय राऊत यांच्यासह नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री अनिल परब यांची हजेरी आहे. या बैठकीत सहाव्या जागेवर झालेल्या पराभवाची कारणं शोधण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. तसंच अपक्ष आमदार शिवसेनेपासून का दुरावले? याबाबतही या बैठकीत चर्चेची शक्यता आहे. त्याचबरोबर अवघ्या 8 दिवसांवर येऊन ठेपलेल्या विधान परिषद निवडणुकीतील रणनितीबाबतही या बैठकीत मुख्यमंत्री आणि शिवसेना नेत्यांमध्ये चर्चेची शक्यता वर्तवली जात आहे.

हे सुद्धा वाचा

पराभवानंतर संजय राऊतांची ‘पाहून’ घेण्याची भाषा!

निवडणुकीत दगाबाजी करणाऱ्यांची नावं उघड करताना संजय राऊतांनी या आमदारांना इशारा दिला. ते म्हणाले, ‘ज्या कुणीही शब्द देऊन दगाबाजी केली आहे. त्यांची यादी आमच्याकडे आहे. नावं आमच्याकडे आहे. कुणी मते दिले नाही हे आम्ही माहीत आहे. कांदे यांचं मत का बाद केलं हा संशोधनाचा विषय आहे. कांदे याचं मत ज्या कारणासाठी बाद झालं. त्याच कारणासाठी आम्ही मुनगंटीवार यांच्या मताला आक्षेप घेतला. अमरावतीच्या शहाण्याचं मत बाद व्हायला हवं होतं. यांना पहाटेची फार सवय आहे पापकर्म करायची. त्यांचा पहाटेपर्यंत उपक्रम सुरू होता. त्याला आमच्या शुभेच्छा आहेत. तुम्ही असेच उपक्रम करत राहा आणि महाराष्ट्राचा घोडेबाजार करत राहा’.