महाराष्ट्रात भाजपकडून कोणाला मिळणार खासदारकीचे बक्षीस, ही नावे चर्चेत

| Updated on: Feb 02, 2024 | 10:56 AM

rajya sabha seats polls | राज्यसभेतील महाराष्ट्रातील सहा खासदारांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. त्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, कुमार केतकर, अनिल देसाई, श्री. व्ही. मुरलीधरन आणि राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण यांचा समावेश आहे.

महाराष्ट्रात भाजपकडून कोणाला मिळणार खासदारकीचे बक्षीस, ही नावे चर्चेत
Follow us on

पुणे, दि.30 जानेवारी 2024 | लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यसभेच्या 56 जागांची निवडणूक जाहीर झाली आहे. देशातील 15 राज्यांतील 56 जागांवर ही निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने 27 फेब्रुवारी रोजी या ठिकाणी मतदान घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. 29 फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे. 50 राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ दोन एप्रिल रोजी पूर्ण होत आहे. तसेच तीन एप्रिल रोजी सहा खासदारांचा कार्यकाळ संपणार आहे. या सर्व जागांवर निवडणूक होणार आहेत. त्यात महाराष्ट्रातील सहा जागा आहेत.

महाराष्ट्रातून कोण होणार निवृत्त

राज्यसभेतील महाराष्ट्रातील सहा खासदारांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. त्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, कुमार केतकर, अनिल देसाई, श्री. व्ही. मुरलीधरन आणि राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण यांचा समावेश आहे. त्यात प्रकाश जावडेकर आणि वंदना चव्हाण यांना पुण्यातून संधी मिळाली होती. यामुळे आता पुण्यातून कोणाला संधी मिळणार? ही चर्चाही रंगली आहे.

पुण्यातून कुणाला संधी?

राज्यसभा निवडणुकीत पुण्यातून कुणाला संधी मिळणार? पुण्यातून कुठला चेहरा राज्यसभेत जाणार याकडे लक्ष लागले आहे. महाराष्ट्रातील सहा पैकी दोन राज्यसभेच्या जागा पुण्यातून रिक्त होत आहे. पुण्यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वंदना चव्हाण आणि भाजपचे प्रकाश जावडेकर यांच्या 2 जागा कमी होणार आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट काय निर्णय घेणार याकडे लक्ष असणार आहे. आता भाजप पुण्यातून एक जागा मिळण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातून 6 जागा, या लोकांची नावे चर्चेत

राज्यसभेसाठी भाजपकडून चाचपणी सुरू झाली आहे. आगामी लोकसभा निवडणूक लक्षात घेऊन भाजप राज्यसभेचे उमेदवार ठरवणार आहे. राज्यातून विनोद तावडे, पंकजा मुंडे आणि विजया रहाटकर यांच्या नावाची चर्चा आहे. जातीय समीकरण लक्षात घेत भाजप राज्यसभेसाठी उमेदवार दिला जाणार आहे. विनोद तावडे यांच्या रणनितीमुळे बिहारमध्ये भाजप पुन्हा सत्तेत आले आहे. यामुळे विनोद तावडे यांना राज्यसभेचे बक्षीस मिळण्याची शक्यता आहे. केंद्रीय नेतृत्व लवकरच याबाबत अंतिम निर्णय घेणार आहे.