रत्नागिरी : रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यात दापोली नगरपंचायच्या (Dapoli Nagarpanchayat) शिवसेनेच्या (Shivsena) नगराध्यक्षा परवीन शेख (Parvin Shaikh) यांच्या कुटुंबियांनी शनिवारी राष्ट्रवादीत प्रवेश (NCP) केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. परवीन शेख यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा न दिल्याने त्या तांत्रिक दृष्ट्या शिवसेनेच्या आहेत. असे असले तरी कार्यकाळ संपल्यावर त्याही राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशी माहिती राष्ट्रवादीकडून देण्यात येते आहे.
राष्ट्रवादीचा शिवसेनेला मोठा धक्का
रायगड कोलाड येथे रायगड मतदार संघाचे खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत रायगडमध्ये त्यांचा हा पक्ष प्रवेश पार पडला. दापोलीत शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादीने शिवसेनेच्या शहरातील राजकरणात मोठा धक्का दिला आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दापोली विधानसभा क्षेत्रात राजकीय वातावरण तापले आहे.
शिवसेनेचे काही महत्त्वाचे पदाधिकारी आमच्या पक्षात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस संदीप राजपुरे यांनी दिली आहे. निवडणुका होईपर्यंत असे पक्षीय अदलाबदल घडामोडी घडत राहतील हे निश्चित आहे.
पहिल्याच निवडणुकीत नगराध्यक्षपदी विराजमान
पाच वर्षांपूर्वी परवीन शेख यांनी शिवसेनेकडून तिकीट मिळवून निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत परवीन शेख यांनी संचिता जोशी यांचा केवळ 11 मतांनी पराभव केला होता. आपल्या पहिल्या वहिल्या निवडणुकीतच त्यांना नगराध्यक्षपदी विराजमान होण्याची संधी त्यांना मिळाली. परवीन शेख यांनी 2016 मध्ये राजकारणात प्रवेश केला. तत्कालीन काँगेस नेते बाळासाहेब बेलोसे यांनीही त्यांना राजकरणात आशीर्वाद दिला होता.
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीत आणण्याचा सुनील तटकरेंचा प्रयत्न
गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे पदाधिकारी राष्ट्रवादीत आणण्यासाठी सुनील तटकरे प्रयत्नशील आहेत. त्यामुळे कोकणात सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीत आणण्यासाठी प्रयत्न करणारे सुनील तटकरे सध्या शिवसेनेचे आमदार आणि प्रवक्ते भास्कर जाधवांच्या रडारवर आलेत. शिवसेना आमदार भास्कर जाधवांनी पक्ष प्रवेशानंतर पहिल्यांदाच मौन सोडत थेट राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरेंवर हल्लाबोल केलाय.
भास्कर जाधवांचा तटकरेंना खिंडीत पकडण्याचा प्रयत्न
मुंबईतल्या कुणबी भवनासाठीच्या पाच कोटींच्या सरकारी निधीच्या बदल्यात दापोलीतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा प्रवेश करून घेतल्याचा आरोप भास्कर जाधवांनी केला. पक्ष प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांना विधान परिषदेवर आमदारकीची जागा देण्याचं आश्वासन राष्ट्रवादीकडून देण्यात आलं. त्यावरून भास्कर जाधवांनी तटकरेंना खिंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय. कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेची विधान परिषदेची 2024 साली रिक्त होणारी जागा राष्ट्रवादीत गेलेल्या पदाधिकाऱ्यांना सुनील तटकरे यांनी द्यावी, असा सल्ला भास्कर जाधवांनी तटकरे यांना देत त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीत घेण्यासाटी सुनील तटकरे यांनी पुढाकार घेतल्याने कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेची 2024 विधान परिषदेची जागा कुणबी समाज्याला द्यावी, अशी मागणी जाधव यांनी केलीय. त्याच बरोबर कुणबी समाज्यावर सुनील तटकरे यांचे प्रेम आहे की आपल्या घराण्याकरिता प्रत्येक गोष्ट करत आलेत हे सिद्ध करण्याची ही नामी संधी असल्याचं विधान करत टोला लगावलाय.
कोकणात धुमशान! भास्कर जाधवांचा सुनील तटकरेंवर हल्लाबोल, सेना पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशावरून कलगीतुरा#bhaskarjadhav #ShivsenaWorkers #suniltatkare https://t.co/jGDpjCcbYN
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 18, 2021
संबंधित बातम्या :
जालन्यात काँग्रेसला झटका, सुधाकर निकाळजे यांचा समर्थकांसह राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश
राष्ट्रवादीत प्रवेश न करणाऱ्या नगरसेवकांची नावंही यादीत, टीम ओमी कलानीवर नामुष्की