संगमेश्वर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधातील वक्तव्य अखेर केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांना भोवले आहे. राणे यांना अखेर रत्नागिरी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना नाशिक पोलिसांकडे सुपुर्द करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे. त्यामुळे कोर्ट काय निर्णय देतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (ratnagiri police arrested narayan rane, will produce in court)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी राणेंविरोधात नाशिक आणि पुण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यामुळे राणेंनी रत्नागिरी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक राणे जिथे थांबले होते, तिथे पोहोचले. राजशिष्टाचाराचे सर्व उपचार पाळल्यानंतर पोलिसांनी राणेंना अटक केली. राणेंना रत्नागिरी पोलीस ठाण्यात नेल्यानंतर कागदपत्रांचं सोपस्कार पार पडल्यानंतर त्यांना नाशिक पोलिसांच्या हवाली करण्यात येणार आहे.
राणेंना नाशिक पोलिसांच्या हवाली केल्यानंतर त्यांना नाशिकच्या किंवा रत्नागिरीच्या कोर्टात हजर केलं जाणार आहे. मात्र, राणेंना आज कोर्टात हजर करणार की उद्या याबाबतची माहिती मिळू शकली नाही. राणे केंद्रीय मंत्री असल्याने त्यांना आजच नाशिक कोर्टात उपस्थित केलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राणेंचा जामीन अर्ज फेटाळून लावल्यानंतर रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक आणि पोलीस राणेंच्या निवासस्थानी पोहोचले. त्यानंतर त्यांनी राणेंना काही कागदपत्रं देण्यात आली. यावेळी पोलीस आणि राणेच फक्त खोलीत होते. भाजपच्या सर्व नेत्यांना आणि राणेंच्या सुरक्षा रक्षकांना खोलीबाहेर ठेवण्यात आलं होतं, अशी प्राथमिक माहिती मिळते. (ratnagiri police arrested narayan rane, will produce in court)
VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 24 August 2021https://t.co/6n2AKA2ENo#4minutes24headlines #NarayanRane #UddhavThackeray
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 24, 2021
संबंधित बातम्या:
नारायण राणेंच्या वक्तव्याचा मुंबई पालिका निवडणुकीत भाजपला फटका बसणार? फडणवीसांचं थेट उत्तर
नारायण राणे म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली खेचली असती, आता राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
राणेंना अटक केली तर जनआशीर्वाद यात्रेचं काय होणार? फडणवीसांकडून प्लॅन जाहीर
(ratnagiri police arrested narayan rane, will produce in court)