“कोणावर काय वेळ येईल सांगता येत नाही”, रविंद्र वायकरांचा संजय राऊतांवर पलटवार

| Updated on: Jul 06, 2024 | 2:28 PM

"वायकर हे ईडी आणि सीबीआयला घाबरुन पळून गेले. याच खटल्यांमुळे ते गेले आणि आता त्यांना क्लीन चीट दिली", असे संजय राऊत यांनी म्हटले होते.

कोणावर काय वेळ येईल सांगता येत नाही, रविंद्र वायकरांचा संजय राऊतांवर पलटवार
Follow us on

Ravindra Waikar Give Advice to Sanjay Raut : मुंबईच्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे नवनियुक्त खासदार रविंद्र वायकर यांना क्लीन चीट मिळाली आहे. जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी रवींद्र वायकरांना मुंबई पोलिसांनी क्लीन चीट दिली आहे. यावरुन शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी वायकर हे ईडी आणि सीबीआयला घाबरुन पळून गेले, असे वक्तव्य केले होते. आता यावर रविंद्र वायकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

“आता फक्त दाऊद इब्राहिमलाच क्लीन चीट द्यायचं बाकी आहे. हे सरकार महाराष्ट्रातील असो किंवा दिल्लीतील ओवाळून टाकलेले सर्व भ्रष्टाचारी आपल्या पक्षात घेतात. त्यानंतर आमची ताकद किती वाढली हे दाखवतात. या सर्वांवर भ्रष्टाचारासंदर्भातील कारवाई करा, ईडी, सीबीआयचे खटले दाखल केले. त्यात वायकरही आहेत. वायकर हे घाबरुन पळून गेले. वायकर हे ईडी आणि सीबीआयला घाबरुन पळून गेले. याच खटल्यांमुळे ते गेले आणि आता त्यांना क्लीन चीट दिली”, असे संजय राऊत यांनी म्हटले होते.

“वेळ कोणावर कशी येते हे सांगू शकत नाही”

त्याबद्दल ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना रविंद्र वायकरांनी संजय राऊतांना खोचक टोला लगावला आहे. संजय राऊतांना जे बोलायचं ते बोलू शकतात. त्यांना जे बोलायचं त्यांनी ते बोलावं. मी त्यांना काय सांगू. वेळ कशी असते आणि कोणावर कशी येते हे सांगू शकत नाही, असे रविंद्र वायकर म्हणाले.

“मला याआधीच क्लीन चीट मिळाली होती”

मी त्यावेळीही सांगितलं होतं की, माझ्यावर झालेले आरोप अत्यंत चुकीचे आहेत. काही दिवसांपूर्वीही मी हेच म्हटलं होतं आणि आताही मी हेच म्हणतोय. सर्वोच्च न्यायलयात याचिका असतानाच मला क्लीनचीट मिळाली होती. महापालिकेने याबद्दलच पत्र दिलं आहे. त्यामुळे आज मला क्लीन चीट मिळालेली नाही. उलट त्यांनी या प्रक्रियेला विलंब केला आहे. मला सर्वोच्च न्यायलयाने याआधीच क्लीन चीट दिली आहे, असेही संजय राऊतांनी यावेळी म्हटले.

रविंद्र वायकरांना क्लीनचीट मिळण्याचे कारण

दरम्यान मुंबईतील जोगेश्वरी या भागात भूखंड घोटाळा झाल्याचा आरोप रविंद्र वायकरांवर झाला होता. या कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणात रविंद्र वायकर यांचा हात असल्याचे बोललं जात होतं. मुंबई महापालिकेच्या जागेवर 500 कोटींच्या 5 स्टार हॉटेलचं बांधकाम केल्याचा आरोप केला जात होता. मातोश्री स्पोर्ट्स ट्रस्टचा आणि सुप्रिमो बँक्वेटच्या नावाने शेकडो कोटींच्या घोटाळ्याचा आरोप असल्याचे समोर आलं होतं. आता अखेर

आता याप्रकरणी मुंबई पोलिसांनी रविंद्र वायकरांना क्लीन चीट दिली आहे. जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी EOW कडून कोर्टात सी समरी रिपोर्ट सादर करण्यात आला. यानंतर आता मुंबई महापालिकेने गैरसमजातून हा गुन्हा दाखल केल्याचे मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे. त्यामुळे रविंद्र वायकरांवरील सर्व गुन्हे मागे घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे.