औरंगाबाद – राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या सभेला परवानगी देऊ नका अशी मागणी आरपीआयच्या (RPI) खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात (Sachin Kharat) यांनी केली आहे. राज ठाकरे हे मनुवादी आणि बहुजन विरोधी नेते आहेत. राज ठाकरे दलित आणि बहुजनांच्या विरोधात काम करतात. त्यांच्या सभेमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी देऊ नका अशी मागणी सचिन खरात यांनी औरंगाबाद पोलिसांकडे केली आहे.
काही दिवसापूर्वी पदावरून हकालपट्टी केल्याने सुहास दशरशे हे नाराज होतं. तेव्हापासून ते अनेक पक्षांच्या संपर्कात ते होते. ते आज मुंबईत देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार आहेत. ते सभेच्यापुर्वी भाजपात गेल्याने राज ठाकरेंच्या सभेला गर्दी कमी होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच पुण्यात आजपासून जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. ही जमावबंदी नऊ मे पर्यंत लागू करण्यात आली आहे.
कुणाच्याही जाण्याने पक्षाला काहीही फरक पडत नसतो. पक्षात असे हजारो कार्यकर्ते असतात. सुहास दशरथे यांना माझ्या शुभेच्छा आहेत. जमावबंदी आदेश लागू झाला तरीही आम्हाला पोलिसांची परवानगी मिळेल. आम्ही एक लाखापेक्षाही जास्त गर्दीची सभा यशस्वी करू अशी प्रतिक्रिया मनसे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी दिली.