Ramdas Athawale : अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रामदास आठवले काय म्हणाले?

| Updated on: Sep 24, 2024 | 1:36 PM

Ramdas Athawale : रामदास आठवले यांनी महायुतीमध्ये त्यांना किती जागा हव्यात तो आकडा सांगितला. "प्रकाश आंबेडकर यांना एवढी मत मिळाली नाहीत की त्यांना राज्यात मान्यता मिळाली नाही. सगळ्या जागा उभ्या करतात, पण त्यांच्या जागा निवडून येत नाहीत" असं रामदास आठवले म्हणाले.

Ramdas Athawale : अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रामदास आठवले काय म्हणाले?
ramdas athavale
Follow us on

“संजय राऊत म्हणतात शिंदेंनी शिंदेच एन्काऊंटर केलं. पण एकनाथ शिंदेंनी शिवसेनेचे एन्काऊंटर केलं. उद्धव ठाकरेंच राजकीय एन्काऊंटर केलं” अशा शब्दात रामदास आठवले यांनी संजय राऊत यांच्यावर बोचरी टीका केली. “अक्षय शिंदे याने केलेला प्रकार निंदनीय होता. माणुसकीला कलंक लावणारी ती घटना होती. मी मागणी केली होती की, त्याला फाशी व्हायला पाहिजे. त्याने पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, म्हणून त्याच्यावर गोळी झाडावी लागली. विरोधी पक्षाने यावर राजकारण करण्याची काही गरज नाही” असं रामदास आठवले म्हणाले.

“महायुतीमध्ये जागावाटपावर चर्चा सुरू आहे. मोठ्या पक्षात सीटचा वाद आहे. अमित शाह महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून ते जागांवर तोडगा काढतील. माझ्या RPI पक्षाला 10 ते 12 जागा आम्हाला मिळाव्यात. या जागा सगळ्या महाराष्ट्रातील आहेत. आम्हाला त्या जागा मिळाल्या तर दलित मतांना वळवण्यात यश येईल” असं रामदास आठवले म्हणाले. “दलित मतदार आपल्या बाजूला वळवण्यासाठी RPI ला एक विधानपरिषद आणि 2 महामंडळं आम्हाला मिळावित, ही आमची मागणी आहे” असं रामदास आठवले म्हणाले.

प्रकाश आंबेडकरांवर काय म्हणाले?

“प्रकाश आंबेडकर यांना एवढी मत मिळाली नाहीत की त्यांना राज्यात मान्यता मिळाली नाही. सगळ्या जागा उभ्या करतात, पण त्यांच्या जागा निवडून येत नाहीत. प्रकाश आंबेडकर यांनी इकडे तिकडे न जाता महायुती सोबत यावं आणि विधानसभा लढवावी ही त्यांना ऑफर आहे” असं रामदास आठवले म्हणाले.