“पंकजाताई, ओबीसी जनगणनेच्या मागणीमुळे मंत्रिपद दिलं नसावं, आता समाजासाठी निर्णय घ्या”

| Updated on: Jul 09, 2021 | 12:01 PM

ओबीसी समाजाची जनगणना करा. ही मागणी केल्यामुळे आपल्याला मंत्रिपद दिले नाही, असे दिसत आहे. त्यामुळे आता ओबीसी समाजासाठी निर्णय घ्या, अशी मागणी सचिन खरात यांनी केली आहे.

पंकजाताई, ओबीसी जनगणनेच्या मागणीमुळे मंत्रिपद दिलं नसावं, आता समाजासाठी निर्णय घ्या
Pankaja Munde Pritam Munde
Follow us on

मुंबई : ओबीसी समाजाची जनगणना करा ही मागणी केल्यामुळे आपल्याला मंत्रिपद दिले नाही, असे दिसते. त्यामुळे आता ओबीसी समाजासाठी निर्णय घ्या, अशी मागणी भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्याकडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (खरात गट) राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात (Sachin Kharat) यांनी केली आहे. गोपीनाथ मुंडेंच्या कन्या आणि बीडच्या भाजप खासदार डॉ. प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांची मोदी सरकारमध्ये मंत्रिपदावर वर्णी लागण्याची चर्चा होती, मात्र त्यांना स्थान मिळालेलं नाही. (RPI Sachin Kharat on Pritam Munde denied Ministry asked Pankaja Munde to take stand for OBC)

काय म्हणाले सचिन खरात?

“आदरणीय पंकजाताई मुंडे, आपण ज्या भारतीय जनता पक्षात काम करत आहात, त्याच भाजपने मंडल आयोगाला विरोध केला होता. कालकथित गोपीनाथ मुंडे हे ओबीसी समाजाचे मोठे नेते होते. मुंडे साहेब सतत ओबीसी समाजाचे प्रश्न संसदेत मांडायचे, याची आठवण आपण भाजपला करुन दिली. 24 जानेवारीला केंद्र सरकारकडे मागणी केलीत, की आम्हीही देशाचे आहोत, ओबीसी समाजाची जनगणना करा. ही मागणी केल्यामुळे आपल्याला मंत्रिपद दिले नाही, असे दिसत आहे. त्यामुळे आता ओबीसी समाजासाठी निर्णय घ्या!” अशी मागणी सचिन खरात यांनी केली आहे.

मुंडेंऐवजी कराडांना संधी का?

राष्ट्रवादीने राज्यात ओबीसी नेत्यांना मंत्रिमंडळात संधी दिली आहे. त्यातल्या त्यात वंजारी समाजातून येणाऱ्या धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड ही नेतेमंडळी कॅबिनेटमध्ये आहेत. पंकजांच्या पराभवानंतर भाजपात वंजारी नेत्यांना स्थान दिलं जात नसल्याची ओरड सुरु झाली होती. त्यानंतरच आधी रमेश कराडांना संधी दिली आणि आता भागवत कराडांना थेट मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालं.

प्रीतम मुंडे आणि भागवत कराड दोन्ही ओबीसी, वंजारी समाजातून येतात. मंत्रिपद कुणाला द्यायचं म्हटलं तर थेट चर्चा प्रीतम मुंडेंचीच होते, झालीय. त्याला दोन कारणं. पहिलं गोपीनाथ मुंडेंची कन्या आणि दुसरं पंकजा मुंडे. त्यातही पंकजांची नाराजी दूर करण्यासाठी प्रीतम मुंडेंना केंद्रात संधी दिली जाईल अशी यावेळेस तरी जोरदार चर्चा होती पण ही पुन्हा फक्त चर्चाच ठरलीय. उलट प्रीतमला डावलून भागवत कराडांना मंत्री केल्यामुळे मुंडे भगिनी आणखी दुखावल्या जातील अशीच आता चर्चा आहे. कारण वंजारी समाज म्हणजे फक्त मुंडे भगिनींची मक्तेदारी नाही असा तर संदेश भाजपालाच त्यांना द्यायचा नसेल ना? अशीही चर्चा आहे.

पाहा व्हिडीओ

 

संबंधित बातम्या :

कराडांना मंत्रीपद म्हणजे वंजारी समाजात फूट, पंकजांना संपूर्ण खतम करण्याचा डाव!

मुंडे भगिनी नाराज नाहीत तर अभिनंदनाचं एक ट्विट का नाही? फडणवीस म्हणाले, बदनाम करू नका? वाचा सविस्तर

भाजपात पुन्हा ‘निष्ठावंत’ विरुद्ध ‘बाहेरचे’? मोदी कॅबिनेट विस्तारावर महाराष्ट्रात मोठी चर्चा, काय घडलंय?

भारती पवार म्हणाल्या, फडणवीसांचे आभार मानते आणि प्रीतम मुंडे, रक्षा खडसेंना हसू आवरेना, तो व्हिडीओ पुन्हा व्हायरल

(RPI Sachin Kharat on Pritam Munde denied Ministry asked Pankaja Munde to take stand for OBC)