महायुतीतून आणखी एक पक्षबाहेर पडणार?, जानकरांनी घेतली पवारांची भेट

| Updated on: Jan 15, 2021 | 7:57 PM

राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचा झालेला दारूण पराभव आणि महाविकास आघाडीला मिळालेलं घवघवीत यश यामुळे भाजपच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीत खळबळ उडाली आहे. ((rsp leader mahadev jankar met sharad pawar)

महायुतीतून आणखी एक पक्षबाहेर पडणार?, जानकरांनी घेतली पवारांची भेट
Mahadev Jankar
Follow us on

मुंबई: राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचा झालेला दारूण पराभव आणि महाविकास आघाडीला मिळालेलं घवघवीत यश यामुळे भाजपच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीत खळबळ उडाली आहे. त्यामुळे महायुतीत अडगळीत पडलेल्या मित्र पक्षांनी नवी मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रीय समाज पार्टीचे (रासप) अध्यक्ष महादेव जानकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चेस उधाण आलं आहे. ही भेट साखर कारखान्याच्या प्रश्नाशी संबंधित असल्याचं जानकर सांगत असले तरी जानकर हे लवकरच महाआघाडीत सामिल होण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. (rsp leader mahadev jankar met sharad pawar)

महादेव जानकर यांनी 3 तारखेला मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात शरद पवार आणि अजित पवार यांची भेट घेतली होती. या तिन्ही नेत्यांमध्ये सुमारे अर्धा तास खलबतं झाल्याचं सांगण्यात येतं. जानकर यांनी ही राजकीय भेट नसल्याचं जाहीर केलं आहे. रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या साखर कारखान्याच्या कामानिमित्ताने पवारांची भेट घेण्यात आल्याची सारवासारव जानकर यांनी केली आहे. तसेच पवारांची भेट घेण्याआधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर चर्चा करून त्यांना या भेटीची कल्पना दिली होती, असा दावाही जानकर यांनी केला आहे.

जानकरांची नवी जुळवाजुळव?

मात्र, नुकत्याच झालेल्या विधानपरिषदांच्या निवडणुका, त्यात भाजपला आलेलं अपयश आणि तीन पक्षांच्या आघाडीला मिळालेलं यश… या पार्श्वभूमीवर जानकर यांच्या या भेटीकडे पाहिले जात आहे. आगामी काळातही या तिन्ही पक्षांनी एकत्र निवडणुका लढवल्या तर ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंतच्या निवडणुकीत भाजपला पराभवाचा सामना करावा लागणार असल्याचं स्पष्ट होत आहे. त्यामुळे जानकर हे नव्याने राजकीय समीकरण जुळवण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. जानकरांच्या पक्षाचा एकच आमदार असला तरी ते मात्र, स्वत: सत्तेच्या पदापासून दूर आहेत. तसेच त्यांच्या पक्षाचं कामही थंडावलं आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना पुन्हा जोमाने उभे करण्यासाठी जानकरांकडून जुळवाजुळव करण्याची शक्यता राजकीय निरीक्षक वर्तवत आहेत.

पराभवानंतर भाजपचे चिंतन; पण मित्रपक्षांना वगळून

विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात भाजपचा पराभव झाल्यानंतर भाजपने त्याबाबतचं चिंतन केलं. या चिंतन बैठकीला भाजपचे सर्व ज्येष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी बदलत्या राजकीय गणितांचा आढावा घेण्यात आला, तसेच नव्या स्ट्रॅटेजीवर चर्चा करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, या बैठकीत महायुतीतील एकाही मित्र पक्षाला बोलावण्यात आलं नव्हतं. तसेच भाजपने अजूनही मित्रपक्षासोबत या निवडणूक निकालाबाबत चर्चा केलेली नाही. त्यामुळे मित्र पक्षांमध्ये नाराजीचा सूर असल्याचं बोललं जात आहे.

बारामतीत जानकरांचं कडवं आव्हान

2014च्या लोकसभा निवडणुकीत महादेव जानकर यांनी बारामतीतून राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. यावेळी त्यांनी प्रचंड मते घेऊन राष्ट्रवादीला धक्का दिला होता. खडकवासल्यात जानकरांना चांगली मते मिळाली होती. तर इंदापूर आणि भोरमध्ये सुप्रिया सुळे यांना जेमतेम मते मिळाली होती. बारामतीत सुप्रिया यांना एक लाख ४२ हजार ६२८ मते, तर जानकर यांना अवघी ५२ हजार मते मिळू शकली. बारामतीने त्यावेळी सुप्रिया यांना साथ दिली नसती तर निकालाचे चित्रं काही वेगळं दिसलं असतं असं बोललं जातं. या निवडणुकीमुळे जानकर चांगलेच चर्चेत आले होते. (rsp leader mahadev jankar met sharad pawar)

 

संबंधित बातम्या:

‘शिवसेनेला शेतीतलं काय कळतं; फक्त मोदींच्या विरोधासाठी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा’

डाव बदलले तरी लबाडांचे घाव तेच आहेत, आशिष शेलारांचा घणाघात

अशोक चव्हाणांचे बेरजेचे राजकारण, भाजपचा बडा नेता काँग्रेसमध्ये

(rsp leader mahadev jankar met sharad pawar)