पुणे : पुण्यातील भाजप आमदाराची एका महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ करतानाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. अतिशय अर्वाच्य भाषेत भाजप आमदार महिला अधिकाऱ्याला बोलत असल्याचं ऑडिओ क्लिपमधून ऐकायला मिळतंय. याच व्हायरल व्हिडीओ क्लिपवरुन राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भाजप आमदारावर हल्लाबोल केलाय. भाजपा आमदारानं हा माज आपल्या घरी दाखवावा, मनपाचे कर्मचारी तुमचे नोकर नाहीत, अशा शब्दात त्यांनी भाजप आमदाराचा समाचार घेतलाय.
व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप राज्याच्या माजी सामाजिक न्यायमंत्र्यांच्या आमदार भावाची असल्याचं अनेक जण म्हणत आहेत. रुपाली चाकणकरांनी देखील त्यांचंच नाव घेत जोरदार टीका केली आहे. पुणे मनपाचे कर्मचारी कुणाचे नोकर नाहीयत. झालेल्या प्रकाराविरोधात महिला अधिकाऱ्याने तक्रार दाखल करावी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीशी उभा राहिल, अशी ग्वाही यानिमित्ताने चाकणकरांनी दिली आहे.
भाजपा आमदारानं हा माज आपल्या घरी दाखवावा, हे पुणे मनपाचे कर्मचारी आहेत कोणाचे नोकर नाहीयत, किंवा कोणच्या पक्षाचे कार्यकर्तेही नाहीयत. भाजपच्या असंस्कृतपणाच्या चिखलात अशीच कमळं उगवणार, अशी टीकाही त्यांनी केलीय. आमदारांनी त्वरित माफी मागावी अशी मागणीही त्यांनी केलीय. संघाचे संस्कार तुम्ही दाखवून दिलेत. पण आता झाल्या प्रकाराबद्दल महिला अधिकाऱ्याची आणि तमाम महिला वर्गाची तुम्ही माफी मागितली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केलीय.
आमदार सुनील कांबळे ही व्यक्ती नव्हे तर प्रवृत्ती आहे.
महिलांना सातत्याने कमी लेखणे, पदोपदी महिलांचा अवमान करणे ही भारतीय जनता पक्षाची प्रवृत्ती असून महिला अधिकाऱ्यास शिवीगाळ करणारे आमदार सुनील कांबळे हे केवळ त्या प्रवृत्तीचे एक उदाहरण आहे.1/2@maharashtra_hmo @PuneCityPolice pic.twitter.com/OqObgC00LX— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) September 26, 2021
पुणे महापालिकेतील कामाच्या लॉकिंग बिलासंदर्भात आमदारांनी महिला अधिकाऱ्याला फोन केला. बिलं काढता की नाही, काय करता ते सांगा? नाहीतर तुमच्याकडे बघून घेतो, असं म्हणत महिला अधिकाऱ्याला आमदारांनी धमकाविण्याचा प्रयत्न करत अतिशय गलिच्छ भाषेत शिवीगाळ केली.
“किती वेळा त्याने तुमच्याकडे यायचं, काम होणार आहे की नाही, नसेल तर तसं सांगा, मी बघतो मग काय करायचं?”, असं आमदार तावातावाने अधिकाऱ्याला म्हणत आहे. त्यावर महिला अधिकारी तुम्ही आमच्या साहेबांना फोन करा, असं सांगतात. त्यावर मी काय तुमचा नोकर आहे का?, तुम्ही तुमच्या साहेबाला फोन करा, आणि मला परत 10 मिनिटांत फोन करा, असं आमदार म्हणतात.
पुण्यातील अनेक व्हॉट्सअप ग्रुपवर ही ऑडिओ क्लिप अतिशय वेगाने व्हायरल होतीय. अनेक जण ही ऑडिओ क्लिप ऐकून संताप व्यक्त करतायत. मात्र जरी ही ऑडिओ क्लिप व्हायरल होत असली तरी टीव्ही 9 या क्लिपची पुष्टी करत नाहीय.
एकंदरितच ही ऑडिओ अतिशय गलिच्छ आणि अर्वाच्य भाषेतली आहे. एका लोकप्रतिनिधीला ही भाषा नक्कीच शोभणारी नाही. महिला अधिकाऱ्याशी अशा प्रकारे बोलणं निश्चित शोभणार नाही. महिलांचा सन्मान करा असं सांगणारे भाजपा नेते आता संबंधित आमदारावर कारवाई करणार का?, हे पाहणे महत्त्वाचं आहे. दरम्यान या ऑडिओ क्लिपशी माझा काही संबंध नाही असं मत भाजप आमदाराने व्यक्त केलंय.
(Rupali Chakankar attacked pune BJP MLA over offensive language phone audio call)
हे ही वाचा :