पुणे : महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी शिवसेना आणि आम्ही आम्ही एका विशिष्ट परिस्थितीत एकत्र आलो आहोत, असं म्हटलं आहे. आमच्यात वैचारिक मतभेद आहेत यात शंका नाही. त्यामुळे प्रत्येकाला आपला पक्ष वाढवावा, असं वाटत असेल तर साहजिक आहे. सर्वजण आपली ताकद वाढवावी यासाठी प्रयत्न करणार त्यामध्ये काही गैर नाही,असं सचिन सावंत म्हणाले. भाजपचे लोकशाहीवर जे गंडांतर आलेलं आहे, ते दूर होत नाही पर्यंत आम्ही एकत्रितपणे राहणार आहोत. तीन पक्ष मिळून एकत्रितपणे सरकार चालवू त्यासाठी किमान समान कार्यक्रम तयार केलाय, त्यावर पूर्ण पाच वर्षे हे सरकार चालेल, असा विश्वास सचिन सावंत यांनी व्यक्त केला. (Congress Spoke person Sachin Sawant said we have ideological differences with Shivsena but we will united till BJP is dangerous to democracy)
सचिन सावंत यांनी मराठा आरक्षणावर मोदी सरकारची भूमिका काय?, असा प्रश्न उपस्थित केला. मराठा आरक्षणाबाबत मोदी सरकार अनुकूल नाही. त्यामुळे भाजपचे राज्यातील नेतृत्वाकडून जाणीवपूर्वक महाविकास आघाडीबाबत अपप्रचार केला जात आहे, असा आरोप सचिन सावंत यांनी केला. भाजपच्या नेत्यांनी मराठा आरक्षणावरुन आग लावण्याचे, लोकांना फितवण्याचे धंदे बंद करावेत, ही विनंती करतो, असंही ते म्हणाले.
मराठा आरक्षणाच्या विषयावर जी न्यायालयीन लढाई सुरु आहे, त्यावर राज्य सरकार प्रामाणिक प्रयत्न करत आहे. महाविकास आघाडीकडून हा लढा लढला जातोय, याची पोटदुखी भाजपला आहे, असा आरोप महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.
महाविकास आघाडी सरकार मराठा आरक्षणाचा लढा देत आहे. त्यामुळे भाजपकडून महाविकास आघाडीची बदनामी केली जाती आहे. आम्ही याचा निषेध करतो, सचिन सावंत म्हणाले. मराठा आरक्षणाला देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असताना आम्ही सर्वांनी एकमताने पाठींबा दिला होता. फडणवीस सरकारने आम्हाला त्यावेळी विश्वासात घेतले नव्हतं, अशी टीका सावंत यांनी केली.
भाजपमधील मराठा नेत्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
मराठा आरक्षणासंदर्भात भाजपमध्ये जे मराठा समाजातले नेते आहेत त्यांच्यातच एकमत नाही. मात्र, भाजपमधील मराठा समाजातील नेत्यांचं लोकांची दिशाभूल करण्यात एकमत आहे, अशी टीका सचिन सावंत यांनी केली. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारची भूमिका स्पष्ट आहे.मात्र, भाजपच्या नेत्यांमध्ये संधीसाधूपणाची स्पष्टता आहे, अशी टीका सचिन सावंत यांनी केली.
राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा करण्यासाठी वेळ मागितली होती. मात्र, पंतप्रधानांनी अजून वेळ दिली नाही हे दुर्दैव आहे, असं सचिन सावंत म्हणाले.
मोदी सरकार मराठा आरक्षणासाठी अनुकूल नाही- सचिन सावंत
लोकल ट्रेन सुरु करण्याबाबत सरकारच्या हालचाली, ठाकरे सरकार मुंबईकरांना दिवाळी गिफ्ट देणार?
(Congress Spoke person Sachin Sawant said we have ideological differences with Shivsena but we will united till BJP is dangerous to democracy)