मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचे वकील अॅड. कमलेश घुमरे (Adv. Kamlesh Ghumre) यांनी आज पत्रकार परिषद घेत धक्कादायक खुलासा केलाय. आम्ही गुन्हा रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत. ईडीकडून अनेक बातम्या येत होत्या. त्यात अनेक विसंगतीही होत्या. नक्की सत्यता काय आहे? हे सांगण्यासाठीच आपण आज आल्याचं घुमरे म्हणाले. या प्रकरणाची सुनावणी संपली आहे. अनिल देशमुख हे सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. याबाबत येणाऱ्या बातम्या केवळ ऐकिव आहेत. हायकोर्टातील प्रकरणावर आपण भाष्य करणार नाही, असंही घुमरे म्हणाले. (Anil Deshmukh’s lawyer Kamlesh Ghumre alleges that Sachin Waze’s statement is under pressure)
सचिन वाझे आणि अनिल देशमुख प्रकरणात न्यायमूर्ती चांदिवाल यांच्या कमिशनसमोर अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. त्या ठिकाणी सचिन वाझे याने प्रतिज्ञापत्र साद केलंय. त्यात तो काही बोलत नाही. त्यात तो 4 कोटी 70 लाख रुपयांबाबत काही बोलत नाही. अनिल देशमुख यांना भेटल्याचंही वाझे सांगत नाही. आपण फक्त जानेवारीमध्ये एकदाच भेटल्याचं सांगत वाझे सांगत असल्याचंही घुमरे म्हणाले. ईडी आणि सीबीआय जेव्हा जबाब घेतात तेव्हा त्यांचा माणूस तिथे असते. मात्र, आयोगासमोर मोकळ्या वातावरणात प्रतिज्ञापत्र दिलं आहे, असंही घुमरे यांनी म्हटलंय.
आयोगासमोर आलेल्या प्रतिज्ञापत्रात सचिन वाझे याने पैसे दिले असं सांगत नाही. सचिन वाझे यांनी दिलेला जबाब हा दबावाखालीच असावा. अधिकाऱ्यांसमोर दिलेला जबाब दबावाखालीच असतो. CRPC मध्ये पोलिसांसमोर दिलेल्या जबाब स्वीकारला जात नाही. 100 कोटी रुपयांचा आरोप खोटा आहे. बारची संख्याही विसंगत आहे, असा दावाही घुमरे यांनी केलाय.
आतापर्यंत अनिल देशमुख, आरती देशमुख, ऋषिकेश देशमुख या तीन जणांना ईडीने समन्स दिलं आहे. आरदी देशमुख यांना आजचं समन्स दिलं होतं. त्या 66 वर्षांच्या आहेत. त्यांना कोरोना झाला आहे. त्यांना अनेक आजार आहेत. त्या गृहिणी आहे. त्यांचा व्यवहाराशी काही संबंध नाही, असंही घुमरे यांनी म्हटलंय. तसंच ईडीने पेपर हे पब्लिक डॉक्युमेंट व्हायला हवे, अशी मागणीही देशमुखांच्या वकिलांनी पत्रकार परिषदेत केलीय.
निलंबित API सचिन वाझेने ईडीकडे अनेक खुलासे केले आहेत. 100 कोटी वसुली प्रकरण आणि अंबानींच्या घराबाहेर ठेवलेल्या स्फोटकांप्रकरणात सचिन वाझे आरोपी आहे. तळोजा जेलमध्ये असलेल्या वाझेने ईडीला दिलेल्या माहितीमुळे तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुखयांचा पाय आणखी खोलात जाण्याची चिन्हं आहेत.
आरोपी सचिन वाझेने तेव्हाचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या संपर्कात असल्याचा खुलासा केला. यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढणार आहेत. वाझे हा स्फोटकांनी भरलेली गाडी अंबानी यांच्या घराजवळ पार्क केल्याच्या गुन्ह्यात आरोपी आहे. या प्रकरणात सचिन वाझे सध्या तळोजा जेलमध्ये आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी वाझेच्या चौकशीसाठी ईडी कोर्टाची परवानगी घेतली होती. त्यानुसार ईडीला 10 ते 12 जुलै या काळात चौकशीसाठी परवानगी मिळाली होती.
हे पैसे सचिन वाझे यांना देण्यात आल्याचं बार मालकांनी जबाब दिला आहे. बार मालकांकडून पैसे घेताना हे पैसे नंबर एक यांना द्यायचे आहेत, असं सचिन वाझे सांगायचा. नंबर वन म्हणजे नक्की कोण याचा खुलासा ईडीच्या अधिकाऱ्यांना होत नव्हता. त्याचाही खुलासा सचिन वाझे याच्या जबाबात झाला आहे. नंबर वन म्हणजे अनिल देशमुख हेच असल्याचं सचिन वाझेने आपल्या जबाबात सांगितल्यांची माहिती ईडी सूत्रांनी दिली आहे.
100 कोटी पैकी चार कोटी 70 लाख रुपयांच्या रोख रखमेचा ईडीच्या तपासात खुलासा झाला आहे. बाकी रक्कम कुठून गोळा झाली, कोणी गोळा केली, ती रक्कम कोणाला देण्यात आली, याचा तपास ईडीचे अधिकारी करत आहेत.
संबंधित बातम्या :
अनिल देशमुखांच्या खासगी सहाय्यकांचा ईडी मुक्काम वाढला, 20 जुलैपर्यंत कोठडीत वाढ
Anil Deshmukh’s lawyer Kamlesh Ghumre alleges that Sachin Waze’s statement is under pressure