‘धनुष्यबाण’ गेलं आता ‘मशाल’ ही जाणार? या पक्षाची सुप्रीम कोर्टात धाव

| Updated on: Feb 23, 2023 | 3:49 PM

उद्धव ठाकरे गटाने आमचं मशाल चिन्ह चोरलं आहे. मशाल चिन्ह परत मिळवण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केल्याचं उदय मंडळ यांनी म्हटलं आहे.

धनुष्यबाण गेलं आता मशाल ही जाणार? या पक्षाची सुप्रीम कोर्टात धाव
Follow us on

मुंबई : उद्धव ठाकरे गटाला आता मशाल चिन्ह मिळवण्यासाठी देखील झगडावं लागत असल्याचं दिसून येतेय. कारण समता पार्टीने मशाल चिन्हावर दावा करत थेट सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलीये. याबाबत बोलताना समता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय मंडळ यांनी म्हटलं की, मशाल चिन्ह समता पार्टीचे आहे . ते आधीही होतं आणि आता इथून पुढे देखील राहील. हे चिन्ह उद्धव ठाकरे गटाने चोरी केल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.

मशाल चिन्ह आम्हाला मिळावं यासाठी आम्ही सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. ज्यांना धनुष्यबाण हे चिन्ह मिळाले तीच खरी शिवसेना आहे आणि जे आता मशाल मशाल करतायात ती समता पार्टीचे मशाल आहे ती त्यांची नाही. ठाकरे गटाकडून वारंवार सांगितलं जातंय की धनुष्यबाण चोरीला गेला. प्रत्यक्षात ज्यांची क्षमता होती त्यांना धनुष्यबाण चिन्ह मिळालं. उलट उद्धव ठाकरे गट चोर आहे त्यांनी आमचं मशाल चिन्ह चोरी केलं. आज त्यांचं अहंकार उध्वस्त झालाय.

शिवसेनेतील अंतर्गत वादावर आता तोडगा निघालाय. शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह मिळालंय. त्यामुळे मशाल चिन्ह हे समता पार्टीचे आहे. ते आम्हाला मिळावं यासाठी याचिका दाखल केल्याचं समता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय मंडल यांनी सांगितलं आहे.

चोर तुम्ही आहात, ठाकरे गटावर पलटवार

ठाकरे गटाकडून समता पार्टीला फूस असल्याचा आरोप करण्यात येतोय. याबाबत बोलताना उदय मंडल यांनी ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांना डी रजिस्टर आणि डी रेकग्नाइज त्याच्यातला अर्थ कळत नाही. त्यांना खासदार कुणी बनवलं . उद्धव ठाकरे यांनी जी गॅंग बनवली आहे ती अशिक्षित लोकांची टोळी आहे. अनिल देसाई किंवा संजय राऊत हे सगळे एकच भाषा बोलतात. जोपर्यंत मशाल त्यांच्याकडे आहे. तोपर्यंत आम्ही संघर्ष करत राहू. ज्यांची क्षमता होती त्यांना धनुष्यबाण चिन्ह मिळालंय. चोर तुम्ही आहात तुम्ही आमची मशाल चोरली असा पलटवार ठाकरे गटावर केला आहे.