Sambhaji Raje : ‘माझा धनंजय मुंडेंना एकच प्रश्न आहे की, त्यांनी…’, संभाजी राजेंचा सवाल

| Updated on: Jan 06, 2025 | 11:22 AM

Sambhaji Raje : संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज सर्वपक्षीय शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेणार आहे. त्याआधी संभाजी राजे यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांना पंकजा मुंडे यांनी जे मौन बाळगलय त्यावर सूचक भाष्य केलं.

Sambhaji Raje : माझा धनंजय मुंडेंना एकच प्रश्न आहे की, त्यांनी..., संभाजी राजेंचा सवाल
Sambhaji Raje
Follow us on

“जे गुन्हे लावलेत, त्यातून ते सहज बाहेर पडू शकतात. मुख्यमंत्री महोदय विधानसभेच्या पटलावर वाल्मिक कराड आणि या सगळ्यांना कनेक्टेड करुन बोलले आहेत. वाल्मिक कराडला सुद्धा खंडणीच्या आरोपात आत घेतलय. या केसशी कनेक्टेड असल्यामुळे त्या पद्धतीने गुन्हे नोंदवावेत म्हणून आम्ही राज्यपालांना भेटणार आहोत” असं संभाजीराजे माध्यमांशी बोलताना म्हणाले. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज सर्वपक्षीय शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेणार आहे. त्याआधी संभाजी राजे यांनी मीडियाशी संवाद साधला. “या सगळ्यांचा मास्टरमाईंड धनंजय मुंडे सगळ्याचा बॉस धनंजय मुंडे त्याने राजीनामा दिला पाहिजे. आधी अंतुले, मग आबा आर.आर.पाटील, अशोक चव्हाण आणि मनोज जोशी यांनी लोकांचा आक्रोश पाहून राजीनामे दिले आहेत. मग हे सरकार धनंजय मुंडे यांना का संरक्षण देतय? अजितदादा का संरक्षण देतायत? आम्ही हे राज्यपाल महोदयांसमोर मांडणार आहोत” असं संभाजीराजे म्हणाले.

मंत्री पंकजा मुंडे बोलत नाहीयत, त्यावरही संभाजी राजे व्यक्त झाले. “पंकजा मुंडे बोलल्या पाहिजेत. हा जातीचा विषय नाही. हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय आहे. पंकजा मुंडे बोलल्या आहेत. वाल्मिक कराडशिवाय धनंजय मुंडेंच पानही हलत नाही. मग, आज गप्प का? बोलायला पाहिजे. हा एकट्याचा विषय नाही. महाराष्ट्राचा विषय आहे. अशाच पद्धतीने चालेल मग महाराष्ट्रात. महाराष्ट्राला हे परवडणार आहे का?. मग, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले आंबेडकरांचे नाव का घ्यायच?” असा सवाल संभाजीराजे यांनी विचारला.

माझा या हत्या प्रकरणाशी संबंध नाही, मग मी राजीनामा का देऊ?

“एसआयटीच्या एका पीएसआयचा वाल्मिक कराडसोबत फोटो आहे. मग चौकशी कशी होणार? चांगले आयपीएस अधिकारी द्या, तर न्याय मिळेल, निष्पक्ष चौकशी होईल” असं संभाजी राजे म्हणाले. धनंजय मुंडे म्हणतात, माझा या हत्या प्रकरणाशी संबंध नाही, मग मी राजीनामा का देऊ? त्यावर संभाजी राजे म्हणाले की, “धनंजय मुंडेंना प्रश्न एवढाच आहे की, आत गेलेले हे लोक कोणाचे आहेत? वाल्मिक कराड हा कोणाचा माणूस आहे? तुमचा संबंध नाही, मग एकदा राजीनामा देऊन तर बघा, होऊन जाऊ द्या फेअर ट्रायल. त्यांचे व्यावसायिक संबंध आहेत. धनंजय मुंडेंच वटमुखत्यार पत्र वाल्मिक कराडकडे. हे वटमुखत्यार पत्र कोणाला देतात? विश्वासू असतो त्यालाच देतोना”