मुंबई : मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणात एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले आहेत. मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या वडील ज्ञानदेव वानखेडे मुस्लीम असल्याचा दावा केलाय. या पार्श्वभूमीवर समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकर, वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. वानखेडे यांच्या कुटुंबियांनी राज्यपाल कोश्यारी यांना निवेदन दिलं आहे. राज्यपालांनी सर्व काही ठीक होईल, असं आश्वासन दिल्याचं ज्ञानदेव वानखेडे यांनी सांगितलं. (Sameer Wankhede’s family met Governor Bhagat Singh Koshyari)
आम्ही खऱ्याची लढाई लढत आहोत. आम्ही आमचं म्हणणं राज्यपालांकडे मांडलं आहे. आम्हाला राज्यपालांचा पाठिंबा हवा आहे. त्याबाबत राज्यपालांनी आश्वासन दिलं आहे. मी असाच लढत राहणार. राज्यपालांकडून आम्हाला आश्वासन मिळालेलं आहे. ती स्फुर्ती घेऊन आम्ही अधिक ताकदीने लढणार आहोत. जी सत्य परिस्थिती आहे ती राज्यपालांकडे मांडली. आमच्या कुटुंबियांना बदनाम केलं जात आहे. इज्जत आणि अब्रूवर टीका केली जात आहे. टॉन्ट मारले जात आहेत. ही सर्व सत्य परिस्थिती राज्यपालांकडे मांडली आहे. राज्यपालांनी सांगितलं की सत्याचा विजय नक्की होईल. राज्यपालांची भेट सकारात्मक झाली आहे. काही सविस्तर माहिती आम्ही देऊ शकत नाही, असं क्रांती रेडकरने सांगितलं.
अभिनेत्री क्रांती रेडकर यांची बहीण हर्षदा दीनानाथ रेडकर या ड्रग्जच्या व्यवसायात असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. नुकतेच समीर वानखेडेंचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात मलिक यांच्याविरोधात 1.25 कोटी रुपयांचा दावा दाखल केला होता. त्यानंतरही नवाब मलिक यांच्याकडून आरोपांची सरबत्ती सुरुच आहे.
समीर दाऊद वानखेडे, तुमची मेहुणी हर्षदा दीनानाथ रेडकर ड्रग्जच्या व्यवसायात आहे का? तिची केस पुणे कोर्टात प्रलंबित असल्यामुळे तुम्ही उत्तर द्या. हा घ्या पुरावा, असं लिहित नवाब मलिक यांनी ट्विटरवर काही कागदपत्रे पुरावे म्हणून सादर केले आहेत.
Sameer Dawood Wankhede, is your sister-in-law Harshada Dinanath Redkar involved in the drug business ?
You must answer because her case is pending before the Pune court.
Here is the proof pic.twitter.com/FAiTys156F— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 8, 2021
नवाब मलिक यांनी नुकतेच पत्रकार परिषद घेऊन ड्रग्ज प्रकरणात आणखी काही गौप्यस्फोट केले होते. हे ‘मेरा नाम जोकर’ आणि ‘संगम’ या दोन इंटरव्हलचे पिक्चर नाहीत. जोपर्यंत व्हिलन आत जात नाही, तोपर्यंत पिक्चर संपणार नाही. ललित हॉटेल सात महिने बुक होते. तिथूनच प्रायव्हेट आर्मी काम करत होती. विलास भानुशाली, धवल भानुशाली, सॅम डिसूजा असे अनेक जण येत होते. तिथे मुलीही येत होत्या. तिथे ड्रग्जही घेतलं जात होतं. ललितमध्ये शबाब आणि कबाब सुरु होते. फक्त नवाब नव्हता. हे सर्व तुमचेच लोक होते. समीर वानखेडेंच्या प्रवक्त्यानेच ती माहिती दिली, असा दावा नवाब मलिक यांनी केला होता.
इतर बातम्या :
‘उदय शेट्टी मजनूमध्ये त्यांचा घुंगरू शेठ झालाय’, चित्रा वाघ यांचा संजय राऊतांना टोला
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मानेचा आणि मणक्याचा त्रास, दोन दिवसांत शस्त्रक्रियेची शक्यता
Sameer Wankhede’s family met Governor Bhagat Singh Koshyari