मोहन भागवत यांनी हे सरकार खाली खेचावं त्यांच्याकडे ही क्षमता आहे, संजय राऊत यांचे आव्हान

| Updated on: Jun 11, 2024 | 12:18 PM

चंद्रबाबू नायडू आणि नितेश कुमार यांची मेहरबानी राहील तोपर्यंत ही सत्ता राहील, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. चंद्रबाबू नितीश कुमार आणि मांझी यांना काय मिळालं? कोणते मोठे मंत्रालय मिळाले ? कोणाला काही मिळाले फक्त भाजप आणि आपापसात वाटून घेतला आहे.

मोहन भागवत यांनी हे सरकार खाली खेचावं त्यांच्याकडे ही क्षमता आहे, संजय राऊत यांचे आव्हान
sanjay raut
Follow us on

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मौन सोडत मणिपूरबाबत विधान केले. आता निवडणूक प्रचार संपला आहे. कटुता संपवा अन् मणिपूरकडे लक्ष द्या, असे मोहन भागवत यांनी म्हटले. त्यावरुन शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. मोहन भागवत यांना काही वाटत असेल तर सरकारला हटवा. मोहन भागवत यांच्या आशीर्वादाने सरकार सुरू आहे. जे अहंकार बाळगत आहेत त्यांना सत्तेवरून बाजूला काढून पहा. तुम्ही आशीर्वाद सरकारला का देताय? मोहन भागवत यांनी संघ आणि भाजपचा काही संबंध नाही, असे स्पष्टपणे सांगावे, असा हल्ला संजय राऊत यांनी केला आहे.

तुम्हाला सत्तेवरुन खाली खेचणार

शरद पवार भटकती आत्मा आहे, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते. केंद्र सरकारमध्ये दोन अतृप्त आत्मा आहेत. चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार या दोन अतृप्त आत्म्यांचा तुम्ही समाधान करा. भटकती आत्मा कोणाचा पिछा सोडत नाही. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाच्या पदावरून हटवत नाही तोपर्यंत आमची आत्मा शांत होणार नाही. नरेंद्र मोदी यांना अतृप्त आत्म्यांची शांती करावी लागेल. ज्याप्रकारे मंत्रिमंडळ तयार केले कॅबिनेट मंत्रीपद दिली, खातेवाटप झाले, त्यानंतर अनेक अतृप्त आत्मा पाहायला मिळतात. एनडीएच्या मित्र पक्षांमध्ये हे पाहायला मिळते. जोपर्यंत सत्तेपासून तुम्हाला खेचणार नाही तोपर्यंत आमची आत्म अतृप्त राहील. तोपर्यंत आमची आत्मा महाराष्ट्रात भटकत राहील.

हे सुद्धा वाचा

हे सरकार टिकणार नाही

आता एनडीए सरकारमध्ये आम्ही मोदींना प्रश्न विचारणार नाहीत. आम्ही चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांना प्रश्न विचारणार आहोत. कारण या दोघांचा संयोग सरकार बनवण्यासाठी आहे. त्यांच्याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी बनू शकत नव्हते. नरेंद्र मोदी यांची सत्ता ही उधार सत्ता आहे. चंद्रबाबू नायडू आणि नितेश कुमार यांची मेहरबानी राहील तोपर्यंत ही सत्ता राहील, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. चंद्रबाबू नितीश कुमार आणि मांझी यांना काय मिळालं? कोणते मोठे मंत्रालय मिळाले ? कोणाला काही मिळाले फक्त भाजप आणि आपापसात वाटून घेतला आहे. हे सरकार टिकणार नाही आजपासून कोणत्याच पक्षाला मोठे मंत्रिपद मिळाले नाही. ईडी आणि सीबीआयचे हत्यार बाजूला काढा आणि लढून दाखवा, हे जर तुम्ही बाजूला काढलं तर एक मिनिट सुद्धा तुम्ही आमच्या समोर टिकणार नाहीत. त्याचा दुरुपयोग करत आणि तुम्ही आमच्या सोबत लढत आहात.