नव्या धमकी बद्दल धन्यवाद, महाग पडेल म्हणजे? Ed पकडून आणखी एक खोटे कांड करणार का? संजय राऊतांचा सवाल

| Updated on: Mar 27, 2022 | 6:03 PM

शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यात आरोप प्रत्यारोप रंगले आहेत.

नव्या धमकी बद्दल धन्यवाद, महाग पडेल म्हणजे? Ed पकडून आणखी एक खोटे कांड करणार का? संजय राऊतांचा सवाल
संजय राऊत
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यात आरोप प्रत्यारोप रंगले आहेत. संजय राऊत यांनी आज सकाळी चंद्रकात पाटील यांच्या वक्तव्यांची खिल्ली उडवली होती. चंद्रकांत पाटील यांच्या दाव्यानं नरेंद्र मोदींची दोन तासांची झोप उडाली असेल, असं संजय राऊत म्हणाले आहेत. ही चमचेगिरीची हद्द आहे. महात्मा गांधी, सरदार पटेल यांना चमचे होते. आता हे चमचे काय बोलतात हे पाहायला हवं, असा टोला संजय राऊत यांनी लगावला होता. तर, सगळी चेष्टा संजय राऊतांना महागात पडेल असं चंद्रकांत पाटील म्हणाले. यावर संजय राऊत नव्या धमकी बद्दल धन्यवाद आणि महाग पडेल म्हणजे काय असा सवाल संजय राऊत यांनी ट्विटद्वारे केला आहे.

संजय राऊतांचं ट्विट

संजय राऊत नेमकं काय म्हणाले

नव्या धमकी बद्दल धन्यवाद.महाग पडेल म्हणजे? काय असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. ईडी पकडून आणखी एक खोटे कांड करणार, बदनामी मोहीम राबवणार. मुलाबाळांना त्रास देणार. बरोबर का असा सवाल संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना केला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबाबत जी भाषा तुम्ही वापरता.चेष्टा करता ते सहन करायचे का असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. शिवसेनेशी केलेली चेष्टा किती महाग पडलीय हा अनुभव आपण घेताय, असा टोला देखील राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे.

सामना वाचणं मी वाचणं बंद केलंय : चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील यांनी माझी राऊतांकडून चेष्टा केली जाते मात्र ती आता अंगावर येणार आहे. सगळी चेष्टा अंगावर येणार आहे. मी जेजे म्हणेल ते खरं ठरतंय. मी म्हणलं काही जात्यात आहेत, आणि काही सुपात आहेत. जात्यातल्यांचं पीठ व्हायला लागलं, असल्याचं प्रत्युत्तर चंद्रकांत पाटील यांनी दिलं होतं.

पाहा व्हिडीओ

इतर बातम्या :

पडळकरांचा गनिमी कावा, एकदा नाही, दोनदा नाही, पडळकरांनी तीनदा करून दाखवलं, सरकार बघत राहिलं

‘ईशान’दार! हेलिकॉप्टर शॉटसह Ishan Kishanनं दाखवून दिलं, का त्याला सर्वाधिक बोली लागली!