जाहिरातीत मोदी यांचा फोटो पण बाळासाहेबांचा नाही…मग ही शिवसेना कोणाची? राऊत यांचा खडा सवाल

| Updated on: Jun 13, 2023 | 10:33 AM

Narendra Modi and Eknath Shinde : शिवसेनेच्या जाहिरातीवरुन राज्यातील राजकारणात चर्चा सुरु झाली आहे. आता या जाहिरातीवरुन संजय राऊत यांनी शिवसेनेवर घणाघाती टीका केली आहे. जाहिरातीत बाळासाहेबांचा फोटो कसा विसरले? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

जाहिरातीत मोदी यांचा फोटो पण बाळासाहेबांचा नाही...मग ही शिवसेना कोणाची? राऊत यांचा खडा सवाल
sanjay raut
Follow us on

मुंबई : राज्यात उत्कृष्ट मुख्यमंत्री कोण? यासंदर्भात एक सर्वेक्षण झाले. त्या सर्वेक्षणाची जाहिरात शिवसेनेकडून वृत्तपत्रांमध्ये करण्यात आली आहे. या जाहिरातीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली आहे. या जाहिरातीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे यांचे फोटो वापरला आहे. त्याशिवाय या जाहिरातीत कोणाचाही फोटो नाही. शिवसेनेकडून ही जाहिरात दिली असताना त्यात बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो का नाही? असा प्रश्न शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

बाळासाहेबांचा फोटो का नाही?

शिवसेनेच्या जाहिरातीत नरेंद्र मोदी यांचा फोटो वापरला आहे, पण बाळासाहेबांचा फोटो नाही. शिवसेना ज्यांचे नाव घेत आहे, त्या बाळासाहेबांचा फोटो यामध्ये नाही. मग ही शिवसेना कोणाची? शिंदेंची सेना ही मोदींची सेना आहे. शाहा यांची सेना आहे. यामुळे त्यांचा खरा मुखवटा उघड झाला आहे. ही तर मोदी यांची ‘शवसेना’ आहे, अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली.

खर्च कोणी केला, सर्वे कुठे झाला

कोट्यवधींच्या जाहिरातीत बाळासाहेबांचा उल्लेख कसा नाही? एकनाथ शिंदे आनंदाच्या क्षणी बाळासाहेबांना कसे विसरले? असा प्रश्न करताना संजय राऊत म्हणाले की, या जाहिरातीचा खर्च कोणी केला. हा पैसा सरकारच्या तिजोरीतून झाला की त्या दोन हजारांच्या नोटा बाहेर आल्या आहे, असा प्रश्न संजय राऊत यांनी केला. हा सर्वे खरा आहे की, खोटा यामध्ये आम्हाला पडायचे नाही, पण हे सर्वेक्षण कुठे झाले, मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात झाले की गुजरातमध्ये झाले, असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला.

हे सुद्धा वाचा

 

काय आहे जाहिरात

राष्ट्रामध्ये मोदी

महाराष्ट्रात शिंदे

अफाट प्रेम मिळते आहे जनतेचे

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जोडीने महाराष्ट्रात केलेल्या लोककल्याणकारी प्रकल्पांमुळे नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात त्यांना अव्वल स्थान मिळाले आहे, असा दावा करणारी जाहिरात करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री पदासाठी कोण

मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे यांना 26.1 टक्के जनतेने पसंती दिली आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांना 23.2 टक्के जनतेला मुख्यमंत्रीपदासाठी पसंती दिली आहे. म्हणजेच, राज्यातील 49.3 टक्के जनतेने पुन्हा या जोडीला पसंती दर्शविली, असल्याचा दावा जाहिरातीत केला आहे.

हे ही वाचा

शिवसेनेकडून जाहिरातबाजी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सर्वेमध्ये किती टक्के मिळाली मते