सेलिब्रिटींना मेंदू नाही काय; संजय राऊत संतापले

| Updated on: Feb 08, 2021 | 2:38 PM

"सेलिब्रिटींना मेंदू नाही का? एरव्ही असतो ना! तुम्हाला सेलिब्रिटी कुणी केलं?", असे सवाल संजय राऊत यांनी केले. (Sanjay Raut reaction on celebrities tweet on Farmers protest)

सेलिब्रिटींना मेंदू नाही काय; संजय राऊत संतापले
Follow us on

मुंबई : “सेलिब्रिटींना मेंदू नाही का? एरव्ही असतो ना! तुम्हाला सेलिब्रिटी कुणी केलं? या रस्त्यावरच्या लोकांनीच केलं ना. या गरिबांना कळतं, ते तुम्हाला कळत नाही का? तुम्हाला कोण वापरून घेतंय हे तुम्हाला कळत नाही का?”, असे सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले. शेतकरी आंदोलनावर सुरु असलेल्या घमासानवर सेलिब्रिटिंनी केलेल्या ट्विटमुळे वेगळा वाद निर्माण झाला आहे. याच मुद्द्यावर संजय राऊत यांनी ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बोलताना प्रतिक्रिया दिली (Sanjay Raut reaction on celebrities tweet on Farmers protest).

दिल्लीच्या सीमेवर गेल्या अडीच महिन्यांपासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर जगप्रसिद्ध पॉपस्टार रिहाना हीने ट्विट केल्यानंतर देशभरातील अनेक कलाकार, खेळाडू अशा सेलिब्रिटिंनी तिला प्रत्युत्तर देत भारतातील घडामोडींमध्ये नाक खुपसू नये, असा सल्ला दिला. याच मुद्द्यावरुन शिवसेना नेते संजय राऊत यांनी सेलिब्रिटिंवर निशाणा साधला. त्याचबरोबर त्यांनी केंद्र सरकारवरही सडकून टीका केली.

“आंदोलन होतच असतात त्यांचं खच्चीकरण करणं हे देशाच्या परंपरेला शोभणारं नाही. भाजप हा पक्ष आंदोलन करूनच पुढे आला. भाजपने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलन केलं. त्यांच्या सायबर फौजांनी बदनामी केली”, असा दावा संजय राऊत यांनी केला.

पवारांनी यूटर्न घेतलेला नाही

“पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यूटर्न घेतला, असं म्हटलं. पण शरद पवार यांनी आपल्या भूमिकेतून यूटर्न घेतलेला नाही”, असं राऊत यांनी स्पष्ट केलं.

“आंदोलन मागे घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक पाऊल पुढे आलं पाहिजे. शेतकरी अज्ञांनी आहेत. शेती, पीक हेच त्याचं जग आहे. केवळ आव्हान करून होत नाही, शेतकऱ्यांसोबत चर्चा करुन ऊंची कमी होणार नाही, ती वाढेल”, असा टोला राऊत यांनी लगावला.

“डंके की चोटपर बोलतात तर बोलू द्या, देशाच्या गृहमंत्र्यांनी डंकेच्या चोटवर बोललं पाहिजे. कुणासाठी डंका पोहोचतो, डंका कुणाच्या स्टेजवरून वाजवता, आमचं काय वाकडं झालं? धुरळा उडाला आणि बसला. त्यांनी नवा प्रयोग करावा. सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्स हे त्यांचं नवे कार्यकर्ते आहेत. त्यामाध्यमातून त्यांनी कारवाई करावी. आम्हाला तुरुंगात टाकावं आम्ही त्यांचे शत्रू आहोत. पण आमचा बालही बाका होणार नाही”, असं राऊत रोखठोकपणे म्हणाले (Sanjay Raut reaction on celebrities tweet on Farmers protest).

हेही वाचा : कौनसी हस्तियाँ कब डूब जाएंगी, शिवसेनेला लवकरच कळेल : भाजप