नवी दिल्ली: महाराष्ट्रात विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विरोधकांनीही उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधकांना सुनावले. निवडणूक नको व्हायला हवी होती. पण कुणी कितीही आपटली तरी विजय महाविकास आघाडीचाच होणार, जिंकणार तर आम्हीच, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. (sanjay raut reaction on maharashtra assembly speaker election)
संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा दावा केला आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक महाराष्ट्रात आहे, त्याचे प्रश्न दिल्लीत विचारले जातात. याबाबत एकतर विधीमंडळ सचिव, संसदीय कार्यमंत्री किंवा मुख्यमंत्री सांगू शकतील. मी अथॉरिटी नाही. याबाबतचं उत्तर मी देऊ शकत नाही. विधानसभा अध्यक्षपदावरील व्यक्तीला प्रदेशाध्यक्षपदी निवड केल्याने ते पद रिक्त झालं. कोव्हिड काळात तिन्ही पक्षांच्या आमदारांना एकत्र करुन निवडणूक घेणं हे सद्यस्थितीत टाळायला हवं असं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं होतं. ते योग्यच होतं. मात्र आता निवडणूक आहे, तिन्ही पक्ष निर्णय घेतील. आज महाराष्ठ्राच्या कानाकोपऱ्यातून आमदार येणार आहेत. त्यांची टेस्ट केल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही. अशा परिस्थितीत एखादा आमदार बाहेर राहिला तर निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो, असं सांगतानाच मुख्यमंत्र्यांचा सर्वांशी संवाद आहे. कोणी कितीही आपटली तरी विजय हा महाविकास आघाडीच्या उमेदवाराचाच होणार. विरोधकांनी निवडणूक टाळली तर महाराष्ट्रावर उपकार होतील. जिंकणार तर आम्हीच, कितीही आरडाओरडा केला, कितीही संशयाचं वातावरण तयार केलं तरीही विरोधी पक्षाला या निवडणुकीत यश मिळणार नाही. विरोधकांनी सामंजस्याने भूमिका घ्यायला हवी होती, असा चिमटा राऊत यांनी काढला.
यावेळी त्यांनी ईडीच्या कारवायांवरही टीका केली. जे सत्ता स्थापन करण्यात किंवा सत्तेत महत्त्वाच्या भूमिका बजावत आहेत. त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांच्यावर कारवाया केल्या जातात. एका कारखान्यावर लाखों लोकांचं जीवन अवलंबून आहे. कारवाई करण्याची धमकी दिली जातेय. हे निर्मळ राजकारण नाही. आमने सामने लढाई करावी. ही महाराष्ट्राची परंपरा नाही. ईडी, सीबीआयचा हा वापर हा तर पाठीतला वार आहे. मी कोणत्याही पक्षाचं नाव घेणार नाही. पण राज्याला हे शोभा देत नाही, असं ते म्हणाले.
राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत झालेल्या गुप्त बैठकीबाबत राऊत यांना छेडण्यात आले. मात्र, राऊत यांनी या बातम्या फेटाळून लावल्या. गुप्त बैठका कसल्या? मी तर उघडपणे फिरणारा माणूस आहे. लोक काहीही बोलतात. कोणत्याही गुप्त बैठका झालेल्या नाहीत, असं त्यांनी स्पष्ट केलं. (sanjay raut reaction on maharashtra assembly speaker election)
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 |https://t.co/skmnlXAhgA#news | #BREAKING
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 1, 2021
संबंधित बातम्या:
Maratha Reservation : पुनर्विचार याचिका फेटाळली, आता संभाजीराजेंनी अखेरचा पर्याय सांगितला
(sanjay raut reaction on maharashtra assembly speaker election)