नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एका बलात्कार पीडित अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी या पीडित कुटुंबासोबतचा फोटो ट्विट करून त्यांना न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. मात्र हा फोटो काढावा म्हणून राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगाने ट्विटर इंडियाला पत्रं लिहिलं आहे. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. राहुल गांधींनी पीडित कुटुंबाचा ट्विटरवर फोटो ठेवणं हा गुन्हा आहे का?, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. (sanjay raut reaction on NCPCR notice to Twitter on pic shared by Rahul Gandhi with rape victim’s family)
संजय राऊत यांननी मीडियाशी बोलताना हा सवाल केला आहे. राहुल गांधी यांनी त्यांच्या ट्विटरवर त्या कुटुंबासोबतचा फोटो टाकला. हा फोटो काढावा म्हणून राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगाने ट्विटर इंडियाला पत्रं लिहिलं आहे. हा काय प्रकार आहे. ही तर हुकूमशाहीच झाली. त्या कुटुंबाची माहिती विरोधी पक्षाचा नेता जनतेला देत असेल तर गुन्हा आहे का?, असा सवाल करतानाच नरेंद्र मोदी हे सुद्धा निर्भयाच्या कुटुंबांना भेटले होते. भाजपचे अनेक नेतेही गेले होते. तेव्हाही ते फोटो प्रसिद्ध झाले होते. तेव्हा ते फोटो काढा असं राष्ट्रीय महिला आयोग किंवा अन्य कुणी सांगितल्याचं आठवत नाही, असं राऊत यांनी निदर्शनास आणून दिलं.
काल दिल्लीत एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला. हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे. विरोधी पक्षाचे नेते त्या मुलीच्या कुटुंबीयांना भेटाला गेले हे सुद्धा सरकारला आवडलेलं नाही. तुम्ही त्यांच्या प्रतिक्रिया पाहा. भारतीय जनता पक्षातर्फे उलट प्रश्न करण्यात आला. काँग्रेसच्या राज्यात बलात्कार होत नाही का? असं भाजपवाले म्हणत आहेत. काँग्रेसच्या राज्यात बलात्कार होतात म्हणून तुमच्या राज्यातील बलात्कार माफ करायचे का?, असा सवाल त्यांनी केला.
राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारला पेगासस मुद्द्यावरून धारेवर धरले. आम्हाला खात्री आहे. आम्हा विरोधी पक्षाला जे म्हणायचे आहे. तिच भूमिका सर्व प्रमुख पत्रकार कोर्टात मांडतील. पेगाससवर चर्चा व्हावी अशी आमची साधी मागणी आहे. या देशात जे काही हेरगिरीचं कांड झालंय ते जाणून घ्यायचा देशाला अधिकार नाही का? सरकार अधिकार नाकारत असेल तर या देशातील लोकशाही आम्ही मोडीत काढली आहे. या देशात लोकशाही, संसदीय लोकशाही, संसद या संस्था आम्ही शिल्लक ठेवल्या नाहीत हे त्यांनी सांगावं, असा हल्ला त्यांनी चढवला. (sanjay raut reaction on NCPCR notice to Twitter on pic shared by Rahul Gandhi with rape victim’s family)
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 5 August 2021 https://t.co/6UUWFgHmvF #News #bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 5, 2021
संबंधित बातम्या:
जिथे सत्ता नाही तिथे राज्यपालांच्या माध्यमातून भाजप सत्ता राबवतंय; संजय राऊतांचा घणाघाती हल्ला
VIDEO: शरद पवारांचं अमित शहांना पुणे भेटीचं निमंत्रण; पुन्हा चर्चेचं गुऱ्हाळ सुरू
VIDEO: ओबीसींच्या 36 वसतिगृहांचं काय झालं?; ओबीसी महासंघाचा पटोले, वडेट्टीवारांना सवाल
(sanjay raut reaction on NCPCR notice to Twitter on pic shared by Rahul Gandhi with rape victim’s family)